Download App

औरंगजेबाचे थडगे काढलेच पाहिजे… अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप कडाडले

MLA Sangram Jagtap Reaction On Aurangzeb’s tomb :  राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे. नुकतेच मनसे नेते राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यातून आणि औरंगजेबच्या कबरीबाबत (Aurangzeb‘s tomb) बोलताना सांगितलं की औरंगजेबची कबर उखडून टाकण्यापेक्षा ‘आम्हा मराठ्यांना संपवयाला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला…,’ असा बोर्ड लावा. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांची प्रतिक्रिया समोर आलीय.

आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय की, की आमचे आणि लाखो तरुणांचे, जनसमुदायाचे मत तेच आहे की थडगे काढलंच पाहिजे. इतिहास सर्वांनाच माहित आहे. इतिहास थोडीच बदलू शकतो. थडगे असले किंवा नसले तरी इतिहास बदलणार (Ahilyanagar News) नाही. त्यामुळे महाराष्ट्रवासियांची जी मागणी आहे, ती आम्ही एक ना एक दिवशी पूर्ण करणार आहोत असं देखील संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलंय.

Video : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, ई-बाईक टॅक्सीला परवानगी; दहा हजारांचं अनुदानही मिळणार

औरंगजेबाची कबर काढण्यावरून राज्यात वातावरण तापलेले आहे, असं असताना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बिनडोक माणसं आहेत, हे वातावरण त्यांनी खराब (Maharashtra Politics) केलंय. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. ते मूकपणे पडद्यामागून उत्तेजन देत आहेत, अशी टीका केली आहे. यावर भाजपचे माजी खासदार सुजय विखे आणि अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Gujrat : फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग; 17 जण होरपळले, ढिगाऱ्याखाली कामगार अडकले

एखादा वेडा असतो, त्याला सगळे वेडेच दिसतात असा खोचक टोला सुजय विखे यांनी लगावलाय. तर संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया देताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना सर्वजण हिंदुत्वाचं काम करत होते. तोपर्यंत त्यांना हिंदुत्व महत्त्वाचं वाटत होतं. परंतु ज्यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे काँग्रेसमध्ये विलनीकरण झाले, त्यामुळे त्यांचे विचार बदलले. त्यामुळे त्यांना फार महत्त्व द्यावसं वाटत नाही. नैराश्यातून कुठल्या ना कुठल्या भूमिका, अशा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पेरत असतात. स्वतः कोणतीही निवडणूक न केल्याने अशा प्रकारचे काहीपण वक्तव्य संजय राऊत करत राहतात, असा टोला संग्राम जगताप यांनी लगावला आहे.

 

follow us