Sanjay Shirsat : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाते नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं. ज्याचे जास्त आमदार असतील, त्याचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य केलं. यावरून आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाला डिवचलं. पवारांनी ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य करून उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिली, अशी टीका केली.
ठाकरेंचं दबावतंत्र, मविआत संघर्ष अटळ? ठाकरेंनी 22 संभाव्य उमेदवार हेरले
संजय शिरसाट यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. शिरसाट म्हणाले की, कालचं शरद पवार यांचं स्टेटमेंट हे जाणीव पूर्वक केलेलं वक्तव्य आहे. उबाठाला कसं संपवायचं, त्याची पद्धतशीर आखणी पवार यांनी केली आहे . सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका मांडली. त्यानंतर पटोलेंनीही तीच भूमिका मांडली. पवारांनीच पृथ्वीराज चव्हाण यांना बोलायला लावले आणि त्याला मुक संमती दिली होती. आता पवारांनी ज्यांचे जास्त आमदार, त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका मांडली. पवार ठाकरे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शिरसाट यांनी केला.
Rockstar डीएसपीने भारत दौऱ्यापूर्वी चाहत्यांना केले खुश, संगीतकाराने थेट व्हिडिओ केला शेअर
ते म्हणाले की, गेल्या आठ दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस कोसळत आहेत, त्यामुळं अनेक धरण भरली. अनेक शेतांत पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने पावलं उचलली आहेत. सर्व विरोधी पक्षांनी देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मात्र स्टंटबाजी करू नका, असं शिरसाट म्हणाले.
पुढं बोलतांना सिरसाट म्हणाले, आदित्य ठाकरे यांचा कालचा दौरा हा निव्वळ राजकीय स्टंट होता. ज्यांना शेतात कोणतं पीक आहे, हे कळत नाही. असे लोक आज बांधावर जात आहेत. आदित्य ठाकरेंना शेतातलं काही कळत नाही. केवळ दोन-तीन शेतात जाणं, शेतकऱ्यांशी हातमिऴवणी करून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे.