Download App

गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे दोन्ही अॅक्टर; शिंदे गटाच्या आमदाराने डिवचलं

MLA Sanjay Shirsat Said Gautami Patil and Sushma Andhare both actors : प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटीलने (Gautami Patil) तिचे पाटील हे आडनाव बदलवावं, अन्यथा महाराष्ट्रात कार्यक्रम करू देणार नाही, अशी भूमिका एका मराठा संघटनेने घेतली आहे. त्यांनंतर कुणी गौतमीच्या समर्थनार्थ उभं राहिलं तर तर कुणी तिच्या विरोधात बाजू घेतलीशिवसेनेच्या उपनेत्या आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनीही फेसबुकवर पोस्ट लिहित गौतमीला समर्थन दिलं होत. दरम्यान, आता शिदें गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी शिरसाट यांनी सुषमा अंधारेंची तुलना गौतमी पाटीलशी केली.

शिरसाट म्हणाले की, गौतमी पाटील आणि सुषमा अंधारे दोन्ही अॅक्टर आहेत. त्या दोन्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार आहेत. त्यामुळं अंधारेंनी गौतमीला सपोर्ट केला. एका अॅक्टरने दुसऱ्या अॅक्टरला सपार्ट करणं यात, गैर असं काहीच नाही. गौतमी पाटील ही इमानदारीने पोटासाठी आपली कला सादर करते. म्हणून तिला वाईट आहे, असे मी म्हणणार नाही. ती तिच्या पोटासाठी खूप महत्त्वाचं काम करत आहे, असं शिरसाट म्हणाले.

यावेळी शिरसाट यांनी अंधारे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, गौतमी पोटासाठी आपली कला लोकांपुढे सादर करते. मात्र, वसुली करून जर कोणी आपलं पोट भरत असेल तर गौतमी आणि त्यांच्यातला हा फरक आहेत. इतरांनी गौतमी पाटीलचा आदर्श घेतला पाहिजे. ती तिच्या हिमतीवर प्रसिध्दीच्या प्रकाशझोतात आली. कुणाचा तळतळाट घेऊन, कुणाचे तरी वाभाडे काढून, इतरांना नावं ठेवून तिने आपली प्रसिध्दी मिळवली नाही, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.

पाकिस्तानकडून धोका! संतापलेल्या ‘आयएमएफ’ने पाकिस्तानला दिले ‘हे’ दोन पर्याय

आज नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींना डावलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यामुळे विरोधकांनी त्याला जोरदार विरोध केला. त्यावर बोलतांना शिरसाट यांनी सांगितले की, प्रत्येक उद्घाटनाला राष्ट्रपती जातात असे होत नाही. त्यांच्यामागे दुसरी काही कार्यक्रम असतात. कुणाला बोलवले नाही म्हणजे हा वादाचा मुद्दा होत नाही. कार्यक्रमाला गालबोट लावायचे आणि टीका करायचे एवढेच विरोधकांचे काम, अशी टीका केली.

यावेळी संजय राऊत यांचाही समाचार शिरसाट यांनी घेतला. सामना मुखपत्राच्या दिल्लीत युध्दाचा प्रसंग, नव्या संसदेचे नवे मालक, असा राऊतांना अग्रलेख लिहिला. यावर भाष्य करतांना शिरसाट म्हणाले, संजय राऊतला कोणते युद्ध दिसत ते मला माहित नाही. देशावर युद्धाचा परिणाम नाही. संजय राऊतला इंटरनल युद्ध करायचे असेल, संजय राऊत सारखा छोट्या मोठ्या नेत्यांनी टीका करून मोदींना काही फरक पडत नाही, असं शिरसाट म्हणाले.

Tags

follow us