Download App

‘मविआ’कडून शाहू महाराज लोकसभा लढणार? आमदार सतेज पाटलांनी स्पष्टचं सांगितलं….

  • Written By: Last Updated:

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसधील (NCP) अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी पक्ष उभारणीसाठी जोरदार कंबर कसली. 25 आणि 26 ऑगस्ट रोजी ते कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. त्यांची जाहीर सभा कोल्हापुरात होत आहे. या कोल्हापूरातील संभेचं अध्यक्षपद श्रीमंत शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) स्वीकारले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांना संधी मिळणार असल्याची चर्चा कोल्हापुरात रंगली. दरम्यान, यावर आता आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सतेज पाटील यांनी अनेक स्थानिक प्रश्नांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी कोल्हापूर मतदार संघातून शाहू महाराज लढलेले चालतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, श्रीमंत शाहू महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे. पण, त्यांची इच्छा काय आहे? त्यांना काय वाटतं हे आधी पाहिलं पाहिजे. अद्याप मी महाराजांशी राजकीय चर्चा केलेली नाही. मात्र, कोल्हापुरमधून पुरोगामी विचारांचा, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडूण यावा अशी आमची अपेक्षा आहे. तिन्हीही पक्ष लोकसभेची तयारी करत आहे. या जागेवर कॉंग्रेसने दावा केला आहे. मात्र, हा दावा केला असला तरी तिन्ही पक्ष एकत्र बसून यावर अंतिम निर्णय घेतील, असं पाटील म्हणाले.

‘घुमर’ ला मिळणार आणखी स्क्रीन्स; ‘गदर 2’, ‘ओएमजी 2’ च्या स्पर्धेत होणार मदत 

कर्नाटकातील बागलकोट येथे परवानगीशिवाय बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नगर परिषदेने हटवला. याविषयी विचारले असता ते म्हणाले, बागलकोटमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला, त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. पुतळा हटवणं हा महाजारांचा अपमानच आहे. त्याठिकाणी नगरपरिषदेत भाजपची सत्ता आहे. हा पुतळा हटवण्याचं पाप भाजपने केलं. भाजपने दुसऱ्याकडे बोट दाखवलं तरी उरलेली चार बोट त्यांच्याकडेच आहेत, असं पाटील म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलताना सतेज पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात कधी काय काय होईल हे सांगता येत नाही. दुर्दैवाने हे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम प्रशासनावर आहे. शासनाच्या योजना तळागाळात पोहोचत नाहीत. यापूर्वी ते महाविकास आघाडीवर टीका करत होते. मात्र आता त्यांच्याच सत्तेत तीन पक्ष सत्तेत आहेत. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर होत असल्याचेही सतेज पाटील म्हणाले.

जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांसाठी पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांना जबाबदार धरले. ते म्हणाले, जिल्ह्यात काही विकासकामांना स्थगिती आणली जाते आहे. जिल्ह्यात पहिलं 10 कोटींचे इनडोअर स्टेडियम मंजूर झाले. मात्र खासदार धनंजय महाडिक यांनी त्यावर स्थगिती आणली, त्याचा खुलासा त्यानी करणे अपेक्षित आहे. राज्य सरकारने आणखी 10 कोटी रुपये द्यावे, पण हे स्टेडियम रद्द करण्याचे पाप करू नये. हा खेळाडूंच्यावर अन्याय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Tags

follow us