‘घुमर’ ला मिळणार आणखी स्क्रीन्स; ‘गदर 2’, ‘ओएमजी 2’ च्या स्पर्धेत होणार मदत

‘घुमर’ ला मिळणार आणखी स्क्रीन्स; ‘गदर 2’, ‘ओएमजी 2’ च्या स्पर्धेत होणार मदत

Ghoomer Screens : अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘घूमर’ (Ghoomer) हा सिनेमा 18 ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झाला. या सिनेमाची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरु होती. कलाकार सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत होते. त्यानंतर देखील आर बाल्की यांचा हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. सुरुवातीच्या पासून घूमरने बुल्स आय हिट केले आहे आणि 2023 च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी तो चित्रपट ठरला आहे. सोशल मीडिया असो किंवा बातम्यांमध्ये घुमरची चर्चा बघायला मिळत आहे.

कैद्यांच्या रोजंदारीत 10% वाढ, जाणून घ्या कशी ठरते तुरुंगातील कमाई?

‘घुमर’ ला मिळणार आणखी स्क्रीन्स…

आता, अशी बातमी आहे की, माऊथ पब्लिसिटी आणि प्रेक्षक, समीक्षक आणि जागतिक क्रिकेट आयकॉन्सच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने अनेक चित्रपट वितरकांनी चित्रपटासाठी अधिक स्क्रीन उपलब्ध करून देण्यासाठी निर्मात्यांशी संपर्क साधला आहे. या घडामोडीच्याबद्दल सांगताना सूत्रानुसार कळतंय आर बाल्कीचा घूमर हा मर्यादित रिलीज होणारा चित्रपट असेल परंतु भारतभर चित्रपटासाठी प्रेमाचा वर्षाव होत आहे. अनेक मोठ्या चित्रपट वितरकांनी निर्मात्यांना त्यांच्या इच्छेनुसार संपर्क साधला आहे. अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर स्टाररच्या शोची संख्या वाढवा.” अस म्हटल जात आहे. आता घूमरला अजून किती स्क्रीन मिळणार हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे.

Happy Bhag Jayegi: आनंद एल राय यांच्या रोम-कॉम ‘हॅपी भाग जायगी’ ची 7 वर्ष !

दरम्यान बॉक्स ऑफिसवर सध्या ‘गदर 2’चा धुराळा बघायला मिळत आहे. तर ‘ओएमजी 2’ सिनेमा देखील अजून सिनेमागृहांमध्ये चालत आहे. अशातच ‘घूमर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. ‘घूमर’ला अगोदरच चालणाऱ्या 2 सिनेमाशी जोरदार स्पर्धा करावी लागली आहे. अभिषेक बच्चनच्या ‘घूमर’ या सिनेमाला रिव्ह्यू मिळाले आहेत. परंतु हा सिनेमा सनी पाजीच्या ‘गदर 2’समोर टिकू शकला नाही. अशा परिस्थितीत चांगला कंटेंट असून देखील ‘घूमर’ला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षक मिळत नसल्यचे चित्र बघायला मिळत आहे.

मोठी स्टारकास्ट असलेला ‘घूमर’ आर बाल्की यांनी दिग्दर्शित केला आहे. क्रिकेटवर आधारित या सिनेमाची जोरदार चर्चा देखील होती. परंतु पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे बघता सिनेमाने फारच निराशाजनक कामगिरी केल्याचे दिसत आहे. तसेच ‘घूमर’ एका दिव्यांग महिला खेळाडूच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर बेतलेला हा सिनेमा आहे. या महिला क्रिकेटपटूची भूमिका अभिनेत्री सैयामी खेरने केली आहे. यामध्ये अभिषेक आणि सैयामीसह अंगद बेदी, शबाना आझमी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube