कैद्यांच्या रोजंदारीत 10% वाढ, जाणून घ्या कशी ठरते तुरुंगातील कमाई?
Maharashtra crime : राज्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या दैनंदिन वेतनात 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाने (Maharashtra Prison Department) ही घोषणा केली आहे. तुरुंग विभागाचे प्रमुख अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले की, शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व तुरुंगांमधील कैद्यांच्या दैनंदिन वेतनात दर तीन वर्षांनी 10 टक्क्यांनी वाढ केली जाते.
सध्या राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृह, 31 जिल्हा कारागृह, 13 खुले कारागृह, एक कारागृह वसाहत आणि दोन महिला कारागृहे आहेत. त्यामध्ये 9 हजार शिक्षा झालेले कैदी आहेत.
अशी होते कामाची विभागणी
कारागृहात बंदिवानांसाठी वेगवेगळी व्यवस्था केली जाते, कैद्यांना वेगळी कामे दिली जातात. या कारागृहांमध्ये कैदी सुतारकाम, चामड्याचे काम, साबण बनवणे, बेकरी आणि शेती अशी अनेक कामे करतात. काही कारागृहांमध्ये हातमाग आणि यंत्रमाग आणि कागदी पिशव्या बनवण्याचे युनिटही आहेत. या तुकड्यांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांना वेगवेगळ्या प्रकारची कामे दिली जातात.
राज ठाकरे घरातून निघाले ही काय ‘ब्रेकिंग न्यूज’ होऊ शकते का? गौरव सोहळ्यात पत्रकारांवरच घसरले
असे मिळते वेतन
तुरुंग विभागाचे प्रमुख अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, कुशल कैद्यांचे रोजचे वेतन 67 रुपयांवरून 74 रुपये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अर्धकुशल दोषींसाठी दैनंदिन मजुरी 61 वरून 67 रुपये आणि अकुशल दोषींसाठी 48 वरून 53 रुपये करण्यात आली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे, खुल्या कारागृहातील कैद्यांचे दैनंदिन उत्पन्न रु. 85 वरून रु. 94 इतके वाढले आहे.
तुरुंगातील प्रत्येक दोषीचे एक खाते आहे ज्यामध्ये पगार जमा केला जातो. काहीजण जेलच्या कॅन्टीनमधून दैनंदिन गरजेच्या वस्तू घेण्यासाठी पैसे वापरतात, तर काहीजण घरी पाठवतात.
Karachi to Noida: सीमाची प्रेमकहाणी उलगडणार रुपेरी पडद्यावर; ‘कराची टू नोएडा’चे पोस्टर रिलीज
समितीने केल्या होत्या सुचना
2014 मध्ये तत्कालीन कारागृह विभागाच्या प्रमुख मीरण बोरवणकर यांनी कैद्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीत कामगार विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश होता. समितीने आठ वर्षांनंतर वेतन सुधारित केलेच नाही, तर दर तीन वर्षांनी वेतन सुधारित करावे, असेही सुचवले आहे.