Karachi to Noida: सीमाची प्रेमकहाणी उलगडणार रुपेरी पडद्यावर; ‘कराची टू नोएडा’चे पोस्टर रिलीज 

Karachi to Noida: सीमाची प्रेमकहाणी उलगडणार रुपेरी पडद्यावर; ‘कराची टू नोएडा’चे पोस्टर रिलीज 

Karachi to Noida Poster Released: पाकिस्तानातून भारत देशात आलेल्या सीमा हैदरची (Seema Haider) सध्या जोरदार चर्चा होत आहे. ऑनलाइन गेम ‘PUBG’ खेळत असताना ती भारतातील सचिन मीनाच्या प्रेमात पडल्याचे बघायला मिळाले. ( Hindi Movie) सीमा तिच्या प्रेमापोटी ती चक्क पतीला सोडून नेपाळमार्गे ग्रेटर नोएडाला आली. आणि तिच्यासोबत ती स्वतःची चार मुले देखील घेऊन देशात आली आहे.

सीमाची प्रेमकहाणी बाहेर येताच मोठ्या प्रमाणात गहजब बघायला मिळाला होता. गेल्या काही दिवस या दोघांच्या प्रेमकहाणीची जोरदार चर्चा देखील बघायला मिळाली आहे. आता तर या प्रकरणावर ‘कराची टू नोएडा’ असा सिनेमा देखील निघणार असल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे. सीमा आणि सचिनच्या प्रेमकहाणीवर सिनेमा बनणार याची चर्चा होती. परंतु या सगळ्या गोष्टी एवढ्या सुपरफास्ट घडतील, याची कुणाला धमक देखील नव्हती.

नुकतंच या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. आणि यातील पहिलं गाणं देखील २० ऑगस्ट दिवशी प्रदर्शित होणार आहे. अमित जानी हे या सिनेमाची निर्मिती करत आहेत. तर भरत सिंह या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. तसेच तयार सीमाची भूमिका अभिनेत्री फरहीन फलक निभावणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकतंच या सिनेमाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिलं पोस्टर प्रदर्शित करत गाण्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

TV Actor Pawan Death: वयाच्या 25 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास; निधनाच्या काही तासांपूर्वी त्याचं…

सीमा आणि सचिनची प्रेमकहाणी ‘पबजी’ गेमपासून सुरू झाल्याचे बघायला मिळाले आहे. गेम खेळत असताना दोघेही संपर्कात आले आणि हळूहळू एकमेकांच्या प्रेमामध्ये पडल्याचे बघायला मिळाले आहे. सीमा विवाहित असून तिला चार मुले असून देखील हे दोघे फोनवर तासंतास बोलत असल्याचे. त्यानंतर सीमा नेपाळमार्गे भारतात आली आहे. एवढेच नव्हे तर सीमा लवकरच मोठ्या पडद्यावर देखील झळकणार आहे. एका सिनेमात सीमाला काम मिळाले असल्याची देखील जोरदार चर्चा रंगत असल्याचे दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube