बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा अन् आप नेते राघव चढ्ढा झाले आई बाबा; सोशल मीडियावर दिली माहिती

अभिनेत्रीच्या परिणीती आई झाली असून तिने बाळाला जन्म दिला आहे. राघव चढ्ढा यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली.

  • Written By: Published:
News Photo (11)

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे नेते राघव चढ्ढा यांनी त्यांच्या बाळाच आगमन झाल्याची बातमी दिली आहे. (Parineeti) अभिनेत्रीच्या प्रसूतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहेत. परिणीती आई झाली असून तिने बाळाला जन्म दिला आहे. राघव चढ्ढा यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

आज सकाळी परिणीतीला दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी होती. ज्यामुळे तिच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना चिंता वाटू लागली. आता, अखेर त्यांच्या घरात छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. राघव आणि परिणीतीने पोस्टमध्ये लिहिले, “शेवटी! आमचा मुलगा आला आहे! या लहान पाहुण्या येण्यापूर्वी आयुष्य कसं होते हे आम्हाला खरोखर आठवत नाही!

भाजपच्या ट्विटनंतर राघव चड्डांचा पलटवार! म्हणाले, रामचन्द्र कह गए सिया से

आमचे हात आता आनंदाने परिपूर्ण भरले आहे आणि आमची हृदयही. आधी आम्ही एकमेकांसाठी होतो पण आता आमच्याकडे सर्वकाही आहे. प्रेम आणि कृतज्ञतेसह, परिणीती आणि राघव. अशी पोस्ट राघव चढ्ढाने केली आहे. याचा अर्थ परिणीताला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. राघवची पोस्ट सोशल मीडियावर येताच चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. सर्वांनी या जोडप्याला त्यांच्या नवीन प्रवासासाठी प्रेम आणि आशीर्वाद पाठवले आहेत. 24 सप्टेंबर 2023 रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे परिणीती आणि राघव यांचा भव्य विवाह सोहळा पार पडला.

या लग्नाला बॉलिवूड आणि राजकारणातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यापूर्वी, या जोडप्याने 13 मे 2023 रोजी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. परिणीतीने एका पॉडकास्टमध्ये तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते. तिने सांगितले की ते लंडनमधील एका कार्यक्रमात भेटले होते. त्यानंतर काही ना काही कारणाने ते एकमेकांना भेटत राहिले अन् काही दिवसांतच त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

follow us