मुंबई : काँग्रेस पक्षाने मला कारवाई आधीही विचारलेलं नाही आणि आताही विचारलं नाही त्यामुळे याबाबत चर्चा करण्याच कारण नसल्याचं वक्तव्य नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्यजित तांबे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घडलेल्या घडामोडींवर भाष्य केलं आहे.
आमदार तांबे म्हणाले, या निवडणुकीत जे काही झालं ते चर्चेतून झालंय, पक्ष कारवाई करणार हे मला अपेक्षितच नव्हतं. पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याशी निवडणुकीआधी उमेदवारीबाबत चर्चा झाली होती. शेवटच्या क्षणी मी जो निर्णय घेणार आहे याबाबतही चर्चा झाली होती. मला त्यांचा फोनही आला होता, शेवटच्या क्षणापर्यंत थांबूया, परिस्थिती पाहुन आपण निर्णय घेऊ, अशी आमची चर्चा झाल्याचा खुलासा सत्यजित तांबे यांनी यावेळी केला आहे.
Threat : मुंबई पोलिसांची झोप उडाली! #mumbaipolice @_MukeshAmbani #AmitabhBachchan #dharmendra https://t.co/cOsoixkpgh
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 1, 2023
तसेच निवडणुकीदरम्यान, महाविकास आघाडीचा पाठिंबा घेण्यासाठी मी गेलो तर काही नेते विरोधी उमेदवारांना सोबत घेऊन फिरत होते. मी पक्षासाठी जेवंढं काम केलंय, तेवढं काम करणारे फार कमी लोकं पक्षात असतील. कितीतरी नेत्यांना मी थोरातांचा भाचा आहे, हे माहीतच नव्हतं. ज्या पक्षासाठी मी जीवाचं रान केलंय त्यांच्याकडून मला कारवाईची अपेक्षा नव्हती, तसेच ते लोकं मला अडचणीत आणतील, अशी खंतही आमदार तांबेंनी यावेळी व्यक्त केलीय.
…तर कानाखाली आवाज काढणार, कामचुकार अधिकाऱ्यांना आमदार भुसारांची तंबी
विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्या काही घडामोडी घडल्या आहेत. त्यातून मला प्रामाणिकपणे बाहेर काढण्यासाठी प्रभारी एच.के. पाटील यांनी प्रयत्न केला, असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, पक्षात येण्याबाबत माझं कोणाशीही बोलणं झालं नसून मी कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं सत्यजित तांबे यांनी ठामपणे सांगितलं आहे. आता मला स्वतंत्र मत मांडण्याची मुभा आहे. त्यामुळे सभागृहात जसे प्रश्न येतील तसे उत्तर देणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
अहमदनगरचे अहिल्यानगर होणारच, पडळकरांनी ठणकावले !
कालपर्यंत जो संघर्ष रस्त्यावर केला आहे, त्याबाबत सभागृहात मुद्दे मांडण्याची संधी मिळाली असून ते मुद्दे आता मी सभागृहात मांडणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी सभागृहाचं एवढं काही काम झालं नाही, पण ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या असल्याचं त्यांनी सांगितलंय.
मी गद्दारांना हलवणारच.., वरळीतून आदित्य ठाकरेंची विरोधकांवर तोफ
बाळासाहेब थोरातांनी मला पद आणि प्रतिष्ठा मिरवण्यासाठी नाहीतर लोकांची कामे करण्यासाठी असल्याचा सल्ला दिला आहे, हा सल्ला आजोबा भाऊसाहेब थोरातांपासून आहे. तीच परंपरा पुढे नेण्याचं काम मी करत असल्याचं आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलंय.