…तर कानाखाली आवाज काढणार, कामचुकार अधिकाऱ्यांना आमदार भुसारांची तंबी

…तर कानाखाली आवाज काढणार, कामचुकार अधिकाऱ्यांना आमदार भुसारांची तंबी

पालघर : पालघरमधील जव्हार पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेतच आमदार सुनिल भुसारा अधिकाऱ्यांवर भडकल्याने गोंधळ झाला आहे. जव्हार पंचायत समितीची वार्षिक सर्वसाधारण आमसभा आयोजित करण्यात आली होती. आमदार भुसारा यांचा पारा चढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये आमसभेत कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आमदार सुनिल भुसारा चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालंय. आमदार भुसारा यांचा अधिकाऱ्यांना धारेवर धरतानाचा व्हिडिओ सध्या चागंलाच व्हायरल होत आहे.

फक्त शहराचच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर

या व्हिडिओमध्ये आमदार भुसारींकडून कामचुकार अधिकाऱ्यांना शिवीगाळही करण्यात आली आहे. मी या जनतेचा पालक असून मला जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून दिल्याचं आमदार भुसारा ठामपणे सांगत असल्याचं दिसून येतंय.

अहेरांनी उणीवावर बोट ठेवले, आरोग्यमंत्र्यांना आली जाग

यापुढे अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केल्यास कानाखाली आवाज करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. कानाखाली आवाज काढणार असल्याचं म्हणताचं आमदार भुसारा यांच्या नावे घोषणा देण्यात आल्या आहेत.

Eknath Shinde :मुख्यमंत्री पडता पडता वाचले, संकटमोचक गिरीश महाजनांनी हात देऊन सावरले

यापुढे अशी फालतूबाजी खपवून घेणार नसून तुमची काम करण्याची लायकी नाही, जेवढा पगार घेता तेवढं काम करा नाहीतर घरीच बसा, या शब्दांत आमदार भुसारेंनी कामचुकार अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे.

दरम्यान, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून कामचुकारपणा होत असल्यानं आमदार सुनिल भूसारा यांना राग अनावर झाला नसून ते अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube