Eknath Shinde :मुख्यमंत्री पडता पडता वाचले, संकटमोचक गिरीश महाजनांनी हात देऊन सावरले

  • Written By: Published:
Eknath Shinde :मुख्यमंत्री पडता पडता वाचले, संकटमोचक गिरीश महाजनांनी हात देऊन सावरले

Maharashtra Budget Session : सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. ९ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विरोधकांनी सत्ताधारी गटाला घेरण्याची तयारी केली.  दरम्यान आज विधानभवनातून बाहेर पडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तोल गेला पण भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी त्यांना सावरलं.

हेही वाचा : विधानसभेत खडाजंगी! भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्षांना धमकावले; फडणवीसांचा आरोप

नक्की काय घडलं ?

विधानसभा अधिवेशनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहातून बाहेर पडत असताना पायऱ्यावरून त्यांचा तोल गेला. त्यावेळी त्यांच्या शेजारी असलेल्या गिरीश महाजन यांनी लागेल हात देऊन त्यांना सावरलं. त्यांनतर मुख्यमंत्री पुन्हा चालत निघून गेले. त्यामुळे भाजपचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही संकट मोचक ठरले अशी चर्चा आज विधानभवनात रंगली होती.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गिरीश महाजन आणि देवेंद्र महाजन या दोघांना आत घाला. म्हणजे भाजप बरोबर बॅकफुटला जाईल असं महाविकास आघाडीचे सरकार असताना ठरले होते असा गंभीर आरोप केला आहे. मागच्या अधिवेशनावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप केला होता. पण आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा आरोप केल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube