विधानसभेत खडाजंगी! भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्षांना धमकावले; फडणवीसांचा आरोप

  • Written By: Published:
विधानसभेत खडाजंगी! भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्षांना धमकावले; फडणवीसांचा आरोप

मुंबई : सत्ता बदलानंतर शिंदे-फडणीवस सरकारचे पहिले महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. ९ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, विरोधकांनी सत्ताधारी गटाला घेरण्याची तयारी केली. मात्र, शिवसेनेच्या फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाकडे पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष दिल्यानंतर या अधिवेशनात ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचं समोर येत आहे. आज सभागृहात बोलतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ठाकरे गटाचे भास्कर जाधवांवर (Bhaskar Jadhav) विधासभा अध्यक्षांना धमकावल्याचा आरोप केला आहे.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मुद्यावर चर्चा असताना भाजप आणि मविआ आमने-सामने आलेत. भास्कर जाधव यांनी पॉईट ऑफ प्रोसिजर मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधव धमकी देत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. यावेळी भास्कर जाधव यांनी माझा पॉईट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही, असं म्हणत सभागृहात गोधळ घातला. सभागृहात चाललंय तरी काय? असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, यावर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

जाधवांच्या आरोपाला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरू झाली आहे का? अध्यक्ष महोदय, हे आम्ही खपवून घेणार नाही. हे योग्य नाही. सगळ्यांना पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडण्याचा अधिकार आहे. पॉईंट ऑफ प्रोसिजर जरूर मांडा. मात्र, भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत. हे कसं चालेल, असं फडणवीस यांनी म्हटलं.

त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, आपल्या विधानसभेला देशात महत्वाचं स्थान आहे. त्यामुळे या खुर्चीचा मान राखणं, हे आपल्या सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. मी अपेक्षा करतो, यापुढे या खुर्चीचा अवमान होणार नाही, याची सदस्य काळजी घेतील.

Ajit Pawar : सरकारने काय-काय केलं बंद ? ; संतापलेल्या अजितदादांनी सभागृहात यादीच वाचली

दरम्यान, फडणवीसांनी केलेल्या आरोपवर जाधवांनी प्रत्त्युत्तर दिलं. ते म्हणाले, मी यापूर्वीच सांगितलं होतं की, माझा आवाज मोठा आहे, म्हणून मी बोलत असतांना दम दिल्यासारखं वाटतं. देवेद्रंजी, तुमचाही आवाज मोठा होता. मात्र, तुम्ही नाना पाटेकरांचं ऐकलं. त्यानंतर तुमचा आवाज लहान झाला. मी पाटेकरांनी घेतलेली तुमची मुलाखत ऐकली आहे, असा टोला जाधवांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube