Download App

VIDEO : आज अर्ज उद्या कर्ज; मुंडेंकडून 300 कोटींचा घोटाळा? सुरेश धसांनी फोडला नवा बॉम्ब

  • Written By: Last Updated:

Suresh Dhas Press Conference On Pik Vima Scam : पिक विमा घोटाळ्यासंदर्भात मंत्री धनंजय मुंडेवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप केले जात आहेत. या संदर्भामध्ये आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत नवीन बॉम्ब टाकला आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस यांनी (Suresh Dhas) पुन्हा एकदा कृषी विभागातील त्या निर्णयांची माहिती देण्याची (Pik Vima Scam) पत्राद्वारे मागणी केलीय. तत्कालीन कृषिमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या, असं त्यांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना लिहिलंय. या पत्रामध्ये अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत पिकविमा घोटाळ्यावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केलेत. सुरेश धस पत्रकार परिषदेत पुरावे दाखवत म्हणाले की, राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळित धान्य या योजनेची महाराष्ट्र शासनाने 2022 मध्ये घोषणा केली होती.

राजकीय वैरातून माझ्यावर केस करण्यात आली होती; कारावासाच्या शिक्षेनंतर काय म्हणाले कोकाटे?

मंत्री धनंजय मुंडे यांनी मूळ बाबी बदलून नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीबाबत चर्चा केली, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. याबाबतचा प्रस्ताव महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंडे यांनी पाठवला, असं देखील सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय. यावेळी 6 मार्च 2023 रोजी धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली त्यात मूळ बाबी बदलून नॅनो युरिया अन् नॅनो डीएपी संदर्भात चर्चा केली. 12 मार्च रोजी तातडीने जीआर काढण्यात आला. 12 मार्चला प्रस्ताव पाठवला अन् लगेच 12 मार्च 2023 रोजी जीआर मिळाला, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

राज्य पुरस्कृत कापूस सोयाबीन आणि इतर धन्य उत्पादकता वाढ महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात 11 मार्च 2022 या दिवशी हे महाविकास आघाडीचे सरकार होते, त्यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेसाठी 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन वर्षांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा सोबतच मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

राजकीय वैरातून माझ्यावर केस करण्यात आली होती; कारावासाच्या शिक्षेनंतर काय म्हणाले कोकाटे?

या योजनेमधून सोयाबीन आणि इतर गळीत पीक धान्य पद्धतीत चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ, साठवणूक सुविधा, नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, संरक्षण देण्यासाठी तारण योजना हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. यामध्ये कापूस 256 कोटी आणि सोयाबीन 294 कोटी, असे 550 कोटी रुपये देण्यात आलेले होते.यामध्ये बियाणे बळकटीकरण हे फक्त कृषी विद्यापीठाला देण्यासाठी कापसाला 15 कोटी, सोयबीनला 35 कोटी म्हणजे असे एकूण 50 कोटी देण्यात आले होते.

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना म्हटलंय की, आदल्या दिवशी अर्ज केला की लगेच दुसऱ्या दिवशी कर्ज मिळते. धनंजय मुंडे यांनी 28 मार्च रोजी पैशांची मागणी केली होती, त्यांना लगेच 31 मार्च रोजी त्वरित पैसे देण्यात आले. यामध्ये अनेक चुका मुंडे यांनी करून ठेवल्यात. महाराष्ट्राचे यंत्रणा महामंडळ मर्यादित यांनी देखील 77 कोटी 85 लाख रुपयांची आवश्यकता आहे, याचे पत्र कृषी आयुक्तांना 28 मार्च रोजी पाठवले. कृषी 31 मार्चला निर्गमित करून टाकले. बॅटरी अपडेटेड स्प्रे पंपची किंमत बाजारामध्ये 1500 रुपये आहे. परंतु महामंडळाने त्याची 3425.60 रुपये किंमत लावलेली आहे. यामध्ये 45 कोटींचा भ्रष्टाचार झालाय.

टेंडर सुद्धा अतिशय डोक्याने टेंडर काढलंय. कोणाला काही कळू नये, असे हे टेंडर काढलंय. वेगळा विषय देऊन महाराष्ट्राची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यांनी दिशाभूल करण्याचा देखील प्रयत्न केलाय. धनंजय मुंडे निविष्ठा खरेदीत बदल करून एमएआयडीसीसाठी 264 कोटी आणि यंत्रमाळ महामंडळासाठी 70 कोटीचा भ्रष्टाचार करण्यात आलाय. आता खरेदीमध्ये नॅनो युरियामध्ये 21 कोटी 26 लाखांचा घोटाळा करण्यात आलाय. नॅनो डीएपीमध्ये 56 कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आलाय.

 

follow us