Download App

ताज अन् ओबरॉय हॉटेलमधील ‘ते’ CCTV फुटेज बाहेर काढा, महाराष्ट्र हादरून जाईल…; उत्तमराव जानकर

आताही जानकरांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. मुंडेंचे ताज अन् ओबरॉय हॉटेलमधील CCTV फुटेज बाहेर काढा, महाराष्ट्र हादरून जाईल, असं जानकर म्हणाले.

  • Written By: Last Updated:

MLA Uttamrao Jankar : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) टीका करताना आमदार उत्तमराव जानक (MLA Uttamrao Jankar) यांची जीभ घसरली होती. त्यांनी मुंडेंचा उल्लेख पुरुष वेश्या असा केला होता. त्यानंतर आताही जानकरांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. मुंडेंचे ताज अन् ओबरॉय हॉटेलमधील CCTV फुटेज बाहेर काढा, महाराष्ट्र हादरून जाईल, असं जानकर म्हणाले.

वाल्मिक कराड अन् लक्ष्मण हाकेंचं एकत्र जेवण; अंजली दमानियांनी फोटो शेअर केला 

गुंडांना पोसणाऱ्यांचाही बंदोबस्त करा
उत्तमराव जानकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, बीड जिल्ह्यात अराजकता निर्माण झाली आहे. गुंडगिरी वाढली आहे. अराजकता निर्माण करणाऱ्यांना राजकीय वरदहस्त लाभल्याशिवाय गुंड तयार होत नाही. राजकारणी जाणीवपूर्वक गुंडाना पोसतात आणि लोकांमध्ये भीती निर्माण करतात. वाल्याकोळ्यांने कुणासाठी रांजन भरले, हे राज्याला माहित आहे. त्यामुळं गुंडांना पोसणाऱ्यांचाही बंदोबस्त झाला पाहिजे, असं जानकर म्हणाले.

राज्यकर्ते ईव्हीएम मशीनमधून आले
पुढं ते म्हणाले, हे राज्यकर्ते ईव्हीएम मशीनमधून आले. त्यामुळं लोकांचा आणि आमचा संबंध नाही, अशी या राज्यकर्त्यांची भूमिका आहे. या राज्यकर्त्यांना लोकांशी देणंघेणं नाही. मुख्यमंत्री या प्रकरणात न्याय देणार नाहीत. सामान्य माणसांनाच उठून न्याय मागावा लागेल, असंही ते म्हणाले.

अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा…
धनंजय मुंडे मंत्रिपदासाठी लॉबिंग करत असल्याचं बोललं जातयं. त्याविषयी विचारलं असता जानकर म्हणाले की, ज्या दिवशी आरोप झाले, त्याच दिवशी मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे होता. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नाही. अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होताय. मात्र, त्यांनीही राजीनामा मागितला नाही. याआधी नुसते आरोप झाले तर आर आर आबा, अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. आता अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि जे संतोष देशमुखचे मारेकरी आहेत, त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असं जानकर म्हणाले.

जानकरांनी मुंडेंचा पुरुष वेश्या असा उल्लेख केल्यानंतर रुपाली पाटील ठोंकरेंनी
जानकरांना राजकीय संस्कृती नाही, अशी टीका केली. त्यावरही जानकरांनी भाष्य केलं. मुंडे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाचे नेते असेच आहेत का? रोज नवा मंच, नवा बाज, नवा ताज हे काय सुरू आहे? तुम्ही ताज, ओबरॉय हॉटेलचे CCTV फुटेज का काढत नाही? ते फुटेज बाहेर काढा आणि लोकांपुढे ठेवा, महाराष्ट्र हादरून जाईल, असं जानकर म्हणाले.

 

 

 

follow us