संतोष देशमुख प्रकरण; तपासातील बारकावे दोन दिवसांत समोर, देशमुख कुटुंबियांनी घेतली फडणवीसांची भेट

संतोष देशमुख प्रकरण; तपासातील बारकावे दोन दिवसांत समोर, देशमुख कुटुंबियांनी घेतली फडणवीसांची भेट

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) तपास यंत्रणांचा अहवाल पुढील दोन दिवसांत मिळणार असून तपासाची संपूर्ण माहिती देण्यात येणार असल्याची माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशममुख यांनी दिलीयं. दरम्यान, देशमुख कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadanvis) यांची भेट घेतली. या भेटीमध्ये देशमुखांनी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली असून गुन्हेगारांना आम्ही सोडणार नसल्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. यावेळी भाजपच्या आमदार नमिता मुदंडा, सुरेश आदी उपस्थित होते.

महायुतीत मनसेची एन्ट्री शिंदेंच्या आडमुठ भूमिकेमुळे फिस्कटली; कार्यकर्त्यांचं ठाकरेंसमोर खळ्ळखट्याक

देशमुख पुढे बोलताना म्हणाले, आम्हाला न्याय पाहिजे, तो कसा मिळतो त्याबद्दल सविस्तर चर्चा झाली असून 26 मे पासून 9 डिसेंबरपर्यंत जेवढे एफआयआर झाले त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती दिलीयं. त्यातील इंटरलिंक आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली असून मागील पाच महिन्यांत काय काय झालं होतं, त्याबाबतही आम्ही माहिती दिली असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलंय.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा सस्पेन्स संपला; कॅबिनेट बैठकीला जाण्यापूर्वी स्वतः केला खुलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही…

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही. कठोर कारवाई होणार असून गॅंग संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही. कुटुंबिय जे अधिकारी म्हणतील त्या अधिकाऱ्यांना एसआटीमध्ये घेणार आहोत. या प्रकरणी बीडमधील व्यावसायिकांना सुद्धा भेटणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केलंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची सविस्तर चर्चा झाली असून आम्हाला फडणवीसांनी आश्वासन दिलंय. त्यांच्यावर आमचा विश्वास असून आम्हाला न्याय मिळेल. तपास यंत्रणांबाबत नेमक काय झालं, कुठपर्यंत तपास आलायं, तपासाची पुढील दिशा काय हे दोन दिवसांत स्पष्ट होणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलंय. पुढील दोन दिवसांत एसआयटीच्या तपासातील बारकावे समोर येणार असून त्यातील खुलासेही समोर येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube