33 टक्के महिला खासदार-आमदार होणार, देशात महिला राज्य येण्याकडे वाटचाल सुरू; CM देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis In Savitribai Phule Jayanti Programme : सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त आज सातारा जिल्ह्यातील नायगावमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपच्या नेत्यांची हजेरी (Savitribai Phule Jayanti) लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर सभेला संबोधित केलंय. यावेळी मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणाची सुरूवात जय ज्योती, जय ज्योती असं म्हणून केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, समाजात क्रांतीची ज्योती ज्यांनी लावली अन् परिवर्तन करून दाखवली सावित्रीआई फुले यांच्याचरणी नतमस्तक होतो. त्यांनी नायगावच्या मातीला नमस्कार केलाय. भुजबळ साहेबांनी नायगावच्या विकासाचा इतिहास सांगितला. दुर्दैवाने हे पवित्र स्थान दुर्लक्षित राहिलं होतं. ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही. ज्या काळात समाजाने सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार नाकारला. स्रियांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक मिळेल, एखादी वस्तू आणि स्त्री यामध्ये कोणताही फरक (Maharashtra Politics) नाही, अशा अवस्थेत समाज होता. त्यावेळी खऱ्या अर्थाने समतेचं बिजारोपण झालं पाहिजे. विषमता संपली पाहिजे, याची मुहूर्तमेढ महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्री फुले यांनी केलीय.
पंकजा मुंडेंचं नावे अपहरण… पण सगळा प्रकारच निघाला बोगस, पोलिसांनी फोडलं माजी उपसरपंचाचं बिंग
शिक्षणाच्या अभावामुळे समाज गुलामगिरीकडे चालला आहे. यातून बाहेर काढायचं असेल तर मला शिक्षण त्यांच्यात रूजवावं लागेल. स्त्रिशिक्षणाचा विषय, केशवपन, विधवांसाठी असणाऱ्या प्रथांविरोधात त्यांनी क्रांतीची ज्योती पेटवली अन् परिवर्तन करून दाखवलं. समाजातल्या कुप्रथा संपवल्या. कोणीही एका भाषणात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करू शकत नाही. स्मारक हे केवळ पुतळ्यापर्यंत मर्यादित नाहीये. स्मारक पुतळ्यासोबत विचारांचं देखील बांधता आलं पाहिजे.
महिला दिनाचं औचित्य, सचिन पिळगांवकर प्रस्तुत ‘स्थळ’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्र शासनाने स्मारक या ठिकाणी तयार करण्याचे ठरवले आहे. लवकरात लवकर हे स्मारक तयार करण्यासाठी प्रयत्न करू असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. बरोबर पुढील पाच वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी होईल, त्यापूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे. पैशाची कमतरता कुठेही पडू देणार नाही.
पुढील पाच वर्षात दोन गोष्टी होणार आहे. बरोबर पाच वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी आहे, अन् त्याचवेळी देशाच्या लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना प्रतिनिधींना आरक्षण मिळाल्यामुळे 33 टक्के महिला खासदार-आमदार होतील. हळूहळू सावित्रीआईंच्या नेतृ्त्वामध्ये आपल्या देशात महिला राज्य येण्याकडे वाटचाल सुरू झाली असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.