Mlc Polls Voting Today : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसंच शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा चार मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. (Mlc Polls) रोजगार आणि पेपर लिक हे प्रकरणं गाजत असताना ( Voting ) पदवीधर मतदानासाठी येतात की नाही अंशी चिंता सर्वच उमेदवारांना आहे.
सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आपापली यंत्रणा कामाला लावली आहे. कोकण आणि नाशिकमध्ये तालुका पातळीवर उमेदरवारांनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांकडं जबाबदारी सोपवली आहे. जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यावर सर्वच उमेदवारांचा भर असेल. नोंदणी केलेले मतदार मतदानासाठी बाहेर पडतील यासाठी राजकीय पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्पना धक्का! अध्यक्षपदाची निवडणूकच लढता येणार नाही; कारण काय?
मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब, भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्यत्वे लढत होत आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार आहेत. गेली ३० वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचं ठाकरे गटापुढे मोठे आव्हान आहे. यंदा भाजपचे किरण शेलार यांच्यासाठी भाजपने मुंबईतील आपली सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. शिवसेना ठाकरे गटाने मुंबईतील आपल्या सर्व शाखांमधून हक्काचे मतदार मतदानासाठी येतील याची खबरदारी घेतली आहे.
मोठी बातमी : लोकसभेत आता घमासान ! Rahul Gandhi यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड
मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात आहेत. सुमारे १५ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात जास्त नोंदणी केलेल्या उमेदवाराला विजयाची नेहमी संधी असते. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत होत आहे.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात सुमारे सव्वा दोन लाख मतदार आहेत. यापैकी सुमारे एक लाख मतदार हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रांपर्यंत येण हेच या मतदारसंघात मोठे आव्हान आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यामान आमदार किशोर दराडे, शिवसेना शिंदे गटाचे संदीप गुळवे असे प्रमुख उमेदवार आहेत. या मतदारसंघातील निवडणूक ही पैसे, साड्या वाटपांच्या आरोपांमुळे अधिक गाजली.
मतदारांना सुट्टी
पदवीधर तसंच, शिक्षक मतदारसंघांत नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शासनाने विशेष नैमित्तिक सुट्टी मंजूर केली आहे.
सद्या राजकीय स्थिती
मुंबई पदवीधर – शिवसेना ठाकरे गट मुंबई शिक्षक, लोकभारती कोकण पदवीधर, भाजप नाशिक शिक्षक, अपक्ष (शिंदे गट)