Download App

महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला पवारांनी हातभार लावू नये; राज ठाकरेंचा टोला

शरद पवार यांनी राज्याचा मणिपूर होण्यासाठी हातभार लावू नये, अशा शब्दात राज ठाकरेंनी पवारांना टोला लगावला.

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray : मणिपूरमध्ये जे घडले तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये घडले, त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असे काहीतरी घडेल, अशी चिंता आता वाटू लागली, असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) प्रत्युत्तर दिलं.

मनू भाकर पुन्हा करणार ‘करिश्मा’, भारताला मिळणार आणखी एक पदक, जाणून घ्या कसं? 

शरद पवार यांनी राज्याचा मणिपूर होण्यासाठी हातभार लावू नये, अशा शब्दात राज ठाकरेंनी पवारांना टोला लगावला.

राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी ते पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं. पूरपरिस्थितीवरून सरकार आणि प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, अशा प्रकारे सरकार चालतं का? राज्यात दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असताना याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती, कोण करू शकतं अर्ज? 

अधिकाऱ्यांना बडतर्फ करून प्रश्न सुटणार नाहीत. महानगर पालिकेतील अधिकारी किंवा सरकारमधील अधिकारी यांच्यात साटंलोटं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारलं असता राज ठाकरेंनी एकाच वाक्यात विषय संपवला. शरद पवारांचे स्टेटमेंट मी ऐकलं नाही. मात्र, पवारांनी राज्याचा मणिपूर होण्यासाठी हातभार लावू नये, अशा शब्दात राज ठाकरेंनी पवारांना टोला लगावला. महाराष्ट्रात जे चालू आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. केवळ मतांसाठी मन प्रदूषित करणं जे सुरू आहे, ते चांगलं लक्षण नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पवार काय म्हणाले?
काल एका कार्यक्रमात बोलतांना शरद पवार म्हणाले, मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर ते राज्य अस्थिर झालं आहे. मात्र, आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावं असं वाटत नाही. मोदींनी मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावसा वाटला नाही. मणिपूरमध्ये जे घडले तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये कर्नाटकातही घडले, त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही असे काहीतरी घडेल, अशी चिंता आता वाटू लागली आहे, असं पवार म्हणाले होते. .

Tags

follow us