मनू भाकर पुन्हा करणार ‘करिश्मा’, भारताला मिळणार आणखी एक पदक, जाणून घ्या कसं?
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणारी मनू भाकर (Manu Bhaker) पुन्हा एकदा देशाला पदक मिळवून देऊ शकते. याचा मुख्य कारण म्हणजे आज (29 जुलै) झालेल्या 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत मनू भाकर, सरबज्योत सिंग (Sarbjyot Singh) कांस्यपदकाच्या सामन्यासाठी पात्र ठरले आहे. त्यामुळे आता देशाला आणखी एक पदक मिळण्याची शक्यता आहे.
मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचा 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेच्या कांस्यपदक सामना उद्या ( 30 जुलै) रोजी कोरियाशी होणार आहे. दुसरीकडे तब्बल 12 वर्षानंतर भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये शूटिंग रेंज स्पर्धेत मनू भाकरने कांस्यपदक जिंकले. ती या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तर भारताच्या रमिता जिंदालने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत सातवे स्थान पटकावले. रमिताने आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत 145 स्कोर केला. एलिमिनेशन सुरु झाले तेव्हा ती सातव्या स्थानावर होती. मात्र त्याला नॉर्वेच्या हेग लीनेट बाहेर काढले.
अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांचा सलग दुसरा पराभव
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या बॅडमिंटन महिला दुहेरीतील भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो या जोडीला जपानच्या नामी मात्सुयामा आणि चिहारू शिदा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे. या स्पर्धेत त्यांचा सलग दुसरा पराभव झाला आहे.
48 मिनिटे चालेल्या या सामन्यात नामी मात्सुयामा आणि चिहारू शिदा या जोडीने अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांचा 21-11, 21-12 असा पराभव केला.
पंतप्रधान कार्यालय ते पुणे पोलीस… सगळ्यांना कामाला लावून IAS पूजा खेडकर गेल्या तरी कुठे?
तर रविवारी झालेल्या सामन्यात कोरियाच्या किम सो येओंग आणि कोंग ही योंग या जोडीकडून अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टोला 18-21, 10-21 असा पराभव पत्करावा लागला होता.