Paris Olympics 2024 : मनू भाकरने रचला इतिहास, नेमबाजीत जिंकले कांस्यपदक

Paris Olympics 2024 : मनू भाकरने रचला इतिहास, नेमबाजीत जिंकले कांस्यपदक

Paris Olympics 2024 : भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पदकाचं खातं उघडलं आहे. भारतीय नेमबाज मनू भाकरने (Manu Bhakar) कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. 22 वर्षीय मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल क्रीडा प्रकारात हे कांस्य पदक जिंकले.

Olympics 2024 : रमिता जिंदालची दमदार कामगिरी; 20 वर्षांनी भारतीय महिला शूटरने गाठली अंतिम फेरी 

नेमबाज मनू भाकरने शनिवारी पात्रता फेरीत तिसरे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मनूने 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधित्व केलं. मनू भाकरने कांस्यपदक जिंकून यंदाच्या ऑलिम्पिक 2024 मधील पहिले पदक जिंकले आहे. पॉईंट 1 गुणाने मागे राहिल्याने मनु भाकरला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मनू भाकरने अंतिम फेरीत 221.7 गुणांसह हे पदक जिंकले.

Paris Olympics 2024 : मनू भाकरने रचला इतिहास, नेमबाजीत कांस्यपदक 

तर या क्रीडा प्रकारात पहिल्या दोन क्रमांकावर दक्षिण कोरियाचे खेळाडू होते. ओ ये जिन हिने 243.2 गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर किम येजी हिने 241 गुणांसह रौप्यपदक जिंकले.

मनू भाकर 21व्या शॉटसह दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती. पण शेवटी तिसऱ्या स्थानावर राहिली. दोन्ही कोरियाच्या नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली. मनू भाकरने जिंकलेलं पदक हे पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे.

दरम्यान, पदक जिंकल्यानंतर मनू म्हणाली, मला सध्या जे वाटत आहे ते शब्दात मांडणे कठीण आहे. पण, मला खूप छान वाटत आहे. मी खूप मेहनत घेतली होती. मी माझ्या सर्व शक्तीनिशी खेळत होते. हे पदक सर्वांचे आहे. आमच्या टीमने मिळून यासाठी प्रयत्न केले होते. आशा आहे अजून भारताने पदकं जिंकायला हवेत, असं मनू भाकर म्हणाली. तिने यानंतर तिच्या कुटुंबाने, प्रशिक्षकांनी आणि स्पॉन्सर्सने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारही व्यक्त केले.

कोण आहे मनू भाकर?

मनू भाकर हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील रहिवासी आहे. 2018 ISSF विश्वचषक स्पर्धेत मनूने भारतासाठी दोन सुवर्णपदके जिंकली. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वयाच्या 16 व्या वर्षी मनूने भारतासाठी दोन सुवर्णपदके जिंकली. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पिस्तुलच्या खराबीमुळे तिला पदक जिंकता आले नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube