Olympics 2024 : रमिता जिंदालची दमदार कामगिरी; 20 वर्षांनी भारतीय महिला शूटरने गाठली अंतिम फेरी
Olympics 2024 Ramita Jindal 10 m Air Rifle Women’s Singles Final : पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Olympics 2024) च्या दुसऱ्या दिवशी भारताची महिला शूटर रमिता जिंदाल (Ramita Jindal) हिने वीस वर्षानंतर एक इतिहास घडवला आहे. तिने दहा मीटर एअर रायफलमध्ये अंतिम फेरी गाठली आहे.
Paris Olympics 2024 : मनू भाकरने रचला इतिहास, नेमबाजीत कांस्यपदक
साठ शॉट क्वालिफाय राऊंडमध्ये ती 631.5 अंकांसह पाचव्या स्थानावर राहिली. यावेळी तिने तिची प्रतिस्पर्धी एलावेनिल वालारिवर हिचा पराभव केला. या कामगिरीसह रमिताने तब्बल वीस वर्षानंतर अंतिम फेरीमध्ये पोहोचत या फेरीत पोहोचणारी दुसरी भारतीय महिला शूटर म्हणून स्थान मिळवलं आहे या अगोदर मनु भाकर हिने ही कामगिरी केली होती. तसेच कोच सुमा शिरूर जिने 2004 मध्ये शूटिंगमध्ये ऑलम्पिक फायनल मध्ये स्थान मिळवलं होतं. तिच्यानंतर आता रमिताचा नंबर लागतो.
लोकसभेच्या मदतीची विधानसभेच्या रुपाने परतफेड करा; शिवसैनिकांचे लंकेंना आवाहन
मनू भाकरने रचला इतिहास, नेमबाजीत कांस्यपदक
पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) स्पर्धेतून भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली. भारतीय नेमबाज मनू भाकरने (Manu Bhakar) कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. 22 वर्षीय मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल क्रीडा प्रकारात कांस्य पदक जिंकले आहे.