जिला पराभवाची धूळ चारली तिलाच फायनलची लॉटरी; ‘विनेश’च्या जखमेवर मीठ

जिला पराभवाची धूळ चारली तिलाच फायनलची लॉटरी; ‘विनेश’च्या जखमेवर मीठ

Vinesh Phogat Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी (Vinesh Phogat) निराशाजनक ठरला. कुस्तीपटू विनेश फोगाटचे वजन फक्त 100 ग्रॅम जास्त भरल्याने तिला ऑलिम्पिकमध्ये अपात्र (Olympics 2024) घोषित करण्यात आले. फोगटचं सुवर्णपदकांचं स्वप्न भंगलं. भारतीयांचाही अपेक्षा भंग झाला. यानंतर आता आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

अंतिम सामन्यात विनेश फोगाट अमेरिकेच्या सारा एन हिल्डेब्रांट हिला टक्कर देणार होती. विनेश फोगाट अंतिम सामन्यात नाही म्हटल्यानंतर आता दुसरा खेळाडू कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अंतिम सामना होईल पण विनेश फोगाटने सेमी फायनलमध्ये ज्या कुस्तीपटूला पाणी पाजलं त्याच खेळाडूला फायनलची लॉटरी लागली आहे. महिला फ्री स्टाइल 50 किलोग्रॅम फायनल सामन्यात सारा एन हिल्टेब्रांट आणि क्यूबाची कुस्तीपटू युसनेलिस गुजमॅन लोपेज लढत होणार आहे.

Vinesh Phogat : विनेश फोगाटचं वजन काल 50 किलो मग आज जास्त कस? 10 क्रावून टाकलेले मुद्दे

पॅरिस ऑलिम्पिक आयोजन समितीने एका निवेदनात सांगितले की विनेश दुसऱ्या दिवशी केलेल्या वजनात अयोग्य आढळून आली. आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमांतील कलम 11 नुसार आता विनेश (भारत) ऐवजी सेमी फायनलमध्ये विनेशकडून पराभूत झालेल्या कुस्तीपटूला फायनल खेळण्याची संधी दिली जाईल. याच कारणामुळे क्यूबा देशाची कुस्तीपटू युसनेलिस गुजमॅन लोपेजला फायनल सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. तर जपानची युइ सुसाकी आणि युक्रेनची ओकसाना लिवाच यांच्यात कांस्यपदकासाठी लढत होणार आहे.

विनेश फोगट अपात्र घोषित

अंतिम सामन्यापूर्वी करण्यात आलेल्या चाचणीत विनेशचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता 50 किलो वजनाच्या अंतिम सामन्यात विनेश फोगट खेळू शकणार नाही. अंतिम सामन्यापूर्वी विनेशवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळेे करोडो भारतीयांच्या पदक मिळवण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे.

“पर्यायांचा विचार करा, तीव्र विरोध करा” PM मोदींनी थेट पॅरिसमध्ये फिरवला फोन

पीएम मोदींनीही दिली प्रतिक्रिया

पीएम मोदींनी सोशल मिडियावर पोस्ट लिहीत या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. विनेश, तुम्ही चॅम्पियन आहात. भारताच्या गौरव आहात आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक आहात. तुमचं अपयश दुःखं देतं. शब्दांत या निराशेच्या भावनांना व्यक्त करता आलं असतं. आव्हानांचा सामना करणं तुझ्या स्वभावात राहिलं आहे. आणखी मजबूत होऊन परत ये आम्ही सगळे तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत, असे ट्विट मोदींनी केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube