अर्धनग्न अवस्थेत पूजा…पैशांचा पाऊस अन् बरंच काही; पुन्हा एकदा नाशिकच्या भोंदूबाबाने महिलेला फसवले!
Nashik Bogus Baba Arun Dhondu Patil Fraud Case: पीडितेला अर्धनग्न अवस्थेत बसवून पूजा केली आणि साडेसात लाख रुपयांना फसवले.
Nashik Bogus Baba Arun Dhondu Patil Fraud Case: पुन्हा एकदा नाशिकच्या भोंदूबाबाने एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. पीडितेला अर्धनग्न अवस्थेत बसवून पूजा केली आणि साडेसात लाख रुपयांना फसवले. या भोंदूबाबा विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवाळीत 31 टक्के कुटुंबं खरेदीच करणार नाहीत; सर्व्हेक्षणात ग्राहकांनी सांगितला ‘मूड’
नेमकं काय घडलं?
पनवेल येथील अस्थमा झालेल्या एका महिलेला नाशिकच्या गंगापूर येथील अरुण धोंडू पाटील या भोंदूबाबाची माहिती मिळाली. पिडीतीने या भोंदूबाबाशी संपर्क साधला. त्याने पिडीतेला आणि तिच्या पतीला आणण्यासाठी पनवेलला गाडी पाठवली, तसेच येते वेळी त्यांच्या डोळ्याला काळी पट्टीही बांधली. नाशिकला पोहचल्यावर अघोरी पुजा करण्यात आली. नंतर पुन्हा डोळ्याला काळी पट्टी बांधून पीडिता आणि तिच्या पतीला पनवेलला सोडले.
आजारपणातून आराम मिळाल्याचे तिला भासले. मग त्या दाम्पत्यांचा भोंदूबाबावर विश्वास बसला. नंतर भोंदूबाबाने त्या दाम्पत्याला पैशाचा पाऊस पाडून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठीची पूजा करण्यासाठी पिडीतेला तिच्या मासिक पाळीच्या रक्ताने माखलेले कपडे आणायला सांगितले. पुन्हा काळी पट्टी बांधून त्या दाम्पत्याला नाशिकच्या बालाजी मंदिराजवळील गंगापूर रोड येथे आणले.
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होणार? मध्यस्थीसाठी गडाखांना पुढे आणणाऱ्या राम शिंदेंना टाळले
तिथे अघोरी पूजा करण्यासाठी पिडीतेला पांढरे पातळ पारदर्शक कपडे घातले. तिच्या अंगावर पाणी टाकले. मानवी कवटी आणि पूजेला लागणारे साहित्य वापरून अघोरी पूजा केली. मंत्रोच्चार करत दोन तास ही पूजा चालली. बोकडाचा बळीही देण्यात आला, पूजा संपली. घरी गेल्यावर पैशांचा पाऊस पडले, असे भोंदूबाबाने सांगितले आणि त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये उकळले.
दाम्पत्य घरी गेल्यावर पाहतात, तर पैशाचा पाऊस काय पडलाच नाही. मग आपली फसवणूक झाल्याचं दाम्पत्याच्या लक्षात आलं. त्यानंतर पिडीतीने भोंदूबाबाकडे दिलेले पैसे परत मागायला सुरुवात केली. तेव्हा पिडीतेला बाबाने उडवा-उडवीची उत्तरे दिली. या सर्व घटनेची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिकच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. नंतर गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भोंदूबाबा अरुण धोंडू पाटील याच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायदा व भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला.
अॅपलचा मोठा निर्णय! एका ग्राहकाला दोनच आयफोन; भारत-अमेरिकेत खरेदीवर मर्यादा
भोंदूबाबा अरुण पाटील हा स्थानिक राजकीय नेत्यांच्या जवळचा असल्याची चर्चा आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. पाटील हा कायम टिळा लावतो. जमिनीची खरेदी-विक्री करतो. देवपूजा करतो. पण भोंदूगिरी करतो, हे आताच कळलंय, असा दावा त्याच्या परिसरात राहणाऱ्यांनी केला.
गुन्हा दाखल झाल्याने भोंदू पाटील सोमवारपासून (दि. 19) पसार आहे. त्याचे शेवटचे ‘लोकेशन’ महिरावणीच्या पुढील भागात असल्याचे पोलिसांनी सांगितले.