“पर्यायांचा विचार करा, तीव्र विरोध करा”; PM मोदींनी थेट पॅरिसमध्ये फिरवला फोन

“पर्यायांचा विचार करा, तीव्र विरोध करा”; PM मोदींनी थेट पॅरिसमध्ये फिरवला फोन

Vinesh Phogat Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी (Vinesh Phogat) निराशाजनक ठरला. कुस्तीपटू विनेश फोगाटचे वजन फक्त 100 ग्रॅम जास्त भरल्याने तिला ऑलिम्पिकमध्ये अपात्र (Olympics 2024) घोषित करण्यात आले. फोगटचं सुवर्णपदकांचं स्वप्न भंगलं. भारतीयांचाही अपेक्षा भंग झाला. या प्रकारावरून देशभरात संतापाची उसळली असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मोदींनी थेट पॅरिसमध्ये फोन केला आणि या सगळ्या प्रकाराची माहिती घेतली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएम मोदींनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्याशी फोनवर चर्चा केली. या प्रकरणाची माहिती घेतली. या निर्णयानंतर भारताकडे काय पर्याय शिल्लक राहतात याचीही माहिती घेतली. या प्रकरणात सर्व पर्यायांवर विचार करा. तसेच अयोग्यतेच्या या निर्णयाच्या विरोध तीव्र आक्षेप नोंदवा असा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या.

Vinesh Phogat : विनेश फोगाटचं वजन काल 50 किलो मग आज जास्त कस? 10 क्रावून टाकलेले मुद्दे

पीएम मोदींनी सोशल मिडियावर पोस्ट लिहीत या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. विनेश, तुम्ही चॅम्पियन आहात. भारताच्या गौरव आहात आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायक आहात. तुमचं अपयश दुःखं देतं. शब्दांत या निराशेच्या भावनांना व्यक्त करता आलं असतं. आव्हानांचा सामना करणं तुझ्या स्वभावात राहिलं आहे. आणखी मजबूत होऊन परत ये आम्ही सगळे तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत, असे ट्विट मोदींनी केले होते.

विनेश फोगट अपात्र घोषित

अंतिम सामन्यापूर्वी करण्यात आलेल्या चाचणीत विनेशचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता 50 किलो वजनाच्या अंतिम सामन्यात विनेश फोगट खेळू शकणार नाही. अंतिम सामन्यापूर्वी विनेशवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळेे करोडो भारतीयांच्या पदक मिळवण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube