गोल्ड मेडल्सचे मानकरी मालामाल; अमेरिका नाही ‘हा’ देश देतो मोठं गिफ्ट

गोल्ड मेडल्सचे मानकरी मालामाल; अमेरिका नाही ‘हा’ देश देतो मोठं गिफ्ट

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत एक (Paris Olympics 2024) सिल्व्हरसह सहा पदकांची कमाई केली आहे. यामध्ये तीन पदके नेमबाजी स्पर्धेतून मिळाले. मनू भाकरने (Manu Bhaker) दहा मीटर एअर पिस्टल शुटींगमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. यानंतर मनू भाकरने सरबज्योत सिंह बरोबर मिक्स्ड टीम दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात पुन्हा कांस्यपदक मिळवले. महाराष्ट्राच्या सप्निल कुसाळेने (Swapnil Kusale) सुद्धा पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोजिशन इव्हेंट मध्ये कांस्यपदक पटकावले.

मनू भाकरने दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचला. ऑलिम्पिक स्पर्धेत (Olympics 2024) दोन पदके जिंकणारी मनू भाकर पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. टोकियो ऑलिम्पिकचा चॅम्पियन नीरज चोप्रा (Neeraj Chopra) मात्र गोल्ड मेडल मिळवण्यात अपयशी ठरला. यावेळी त्याला सिल्व्हर मेडलवरच (Silver Medal) समाधान मानावे लागले. नीरज चोप्राने सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदके जिंकली. नीरजच्या आधी सुशील कुमार, पीव्ही सिंधू आणि मनू भाकरने अशी कामगिरी केली आहे.

स्वत: चा देश सोडत दोन देशांसाठी ऑलम्पिक पदकांना गवसणी; कोण आहे Manu Bhaker ची पिस्टल कोच?

ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहेत तेव्हा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या देशांकडून काय बक्षीस दिले जाते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आज आपण याच प्रश्नांचं उत्तर जाणून घेऊ या..

हाँगकाँग

हाँगकाँग चीनचे नियंत्रण असले तरी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये हाँगकाँग (HongKong) स्वतंत्रपणे भाग घेतो. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या आपल्या खेळाडूंना हाँगकाँग सरकार सर्वाधिक रकमेचे बक्षीस देणार आहे. CNBC नुसार ऑलिम्पिक स्पर्धेत पोडियममध्ये आघाडीवर राहणाऱ्या खेळाडूला 7 लाख 68 हजार अमेरिकी डॉलर म्हणजेच 6.45 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत.

ऑलिम्पिकमध्ये हाँगकाँगच्या तलवारबाज वाई विवियन कोंगने महिला वैयक्तिक गटात तर चेऊंग का लोंगने पुरुष फॉईल वैयक्तिक स्पर्धेत प्रत्येकी 1-1 सुवर्णपदक जिंकलं. आता नियमानुसार हाँगकाँग सरकार दोन्ही खेळाडूंना 7 लाख 68 हजार डॉलर पुरस्कार म्हणून देणार आहे. सिल्व्हर आणि ब्राँझ पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे 3.22 कोटी आणि 1.61 कोटी रुपये देणार आहे.

सिंगापूरही करणार बक्षीसांचा वर्षाव

ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना बक्षिसे देण्यात सिंगापूर सुद्धा हाँगकाँगच्या फार मागे नाही. सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना सिंगापूर (Singapore) सरकार 6.25 कोटी रुपये बक्षीस म्हणून देणार आहे. सीएनबीसीच्या रीपोर्टनुसार टॉप पाच देशांमध्ये इंडोनेशिया 2.51 कोटी रुपये, इजरायल 2.28 कोटी रुपये, कजाकस्तान 2.09 कोटी रुपये या देशांचा समावेश आहे.

Paris Olympics 2024: चक दे इंडिया ! भारताला हॉकीमध्ये सलग दुसरे कांस्यपदक, स्पेनचा 2-1 ने धुव्वा

अमेरिका देणार फक्त 32 लाख

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या (Gold Medal) खेळाडूंना अमेरिका 38 हजार डॉलर म्हणजेच 31.90 लाख रुपये बक्षीस म्हणून देणार आहे. भारत सरकारही आपल्या पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना भरघोस बक्षीस देणार आहे. क्रीडा मंत्रालयानुसार सन 2019 मध्ये केंद्र सरकारने गोल्ड मेडल विजेत्या खेळाडूंना 75 लाख रुपये, सिल्व्हर पदक विजेत्या खेळाडूंना 50 लाख रुपये तर कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना 30 लाख रुपये बोनस म्हणून दिले होते.

1997 पर्यंत ब्रिटिशांच्या नियंत्रणात हाँगकाँग

सन 1997 पर्यंत हाँगकाँग ब्रिटिशांच्या नियंत्रणात होता. यानंतर चीन आणि ब्रिटन सरकार मूळ कायद्यावर सहमत झाले. या कायद्यानुसार चीन (China) पुढील पन्नास वर्षे हाँगकाँगवर शासन करेल. मूळ कायद्यानुसार हाँगकाँग पिपुल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे एक स्वायत्त विशेष प्रशासनिक क्षेत्र म्हणून राहील. यानुसार हाँगकाँगचे स्वतः चे चलन, कायदा आणि संसदीय प्रणाली असेल. हाँगकाँग मध्ये सन 2021 मध्ये जनगणना करण्यात आली होती. त्यावेळी हाँगकाँगची लोकसंख्या 7,413,070 होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube