Neeraj Chopra: नदीम पण आमचाच मुलगा… आम्ही समाधानी आहोत, नीरजच्या आईची प्रतिक्रिया

Neeraj Chopra:  नदीम पण आमचाच मुलगा… आम्ही समाधानी आहोत, नीरजच्या आईची प्रतिक्रिया

olympics 2024 :  भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (olympics ) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विक्रम केलाय. त्याने रौप्य पदक जिंकलं आहे. सलग दोन पदकं जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. नीरज चोप्राला सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. मात्र, पाकिस्तानच्या अरशद नदीमने त्याचं हे स्वप्न भंग केलं. अरशद नदीमने विक्रमी ९२.९७ मीटर थ्रो करून विक्रम केला.

दररोज अपमान होतोय! संतापाच्या भरात सभापती निघून गेले;विनेशवरून राज्यसभेत गदारोळ

दरम्यान, नीरजच्या या यशानंतर त्याची आई सरोज देवी यांनी आनंद व्यक्त केला आहे. सरोज देवी म्हणाल्या, सुवर्ण मिळालं नाही याबाबत कसलीही खंत नाही. त्यांनी अरशद नदीम याचं तोंडभरून कौतुक केलं. नीरजने सुवर्ण जिंकलं नसलं तरी नदीम देखील आमचाच मुलगा आहे. त्याने पण खूप कष्ट घेतले होते, असं त्या म्हणाल्या आहेत. त्यांच्या या प्रतिक्रियेने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहे.

Paris Olympics 2024: चक दे इंडिया ! भारताला हॉकीमध्ये सलग दुसरे कांस्यपदक, स्पेनचा 2-1 ने धुव्वा

‘आज आनंदाचा दिवस आहे. आमच्यासाठी रौप्य पदक सुवर्ण पदकासारखाच आहे. सुवर्ण पदक अरशद नदीमला मिळाले. तो देखील आमचाच मुलगा आहे. त्याने खूप कष्ट घेतले होते. मी नीरजने केलेल्या कामगिरीवर समाधानी आहे. नीरज जेव्हा घरी येईल तेव्हा त्याच्या आवडीचं जेवण करेन असही त्या म्हणाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नीरज आणि नदीम हे चांगले मित्र आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube