Paris Olympics 2024: चक दे इंडिया ! भारताला हॉकीमध्ये सलग दुसरे कांस्यपदक, स्पेनचा 2-1 ने धुव्वा

  • Written By: Published:
Paris Olympics 2024: चक दे इंडिया ! भारताला हॉकीमध्ये सलग दुसरे कांस्यपदक, स्पेनचा 2-1 ने धुव्वा

Paris Olympics 2024, India won bronze medal: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) भारतीय पुरुष हॉकी संघाने (hockey team India) स्पेनचा 2-1 ने धुव्वा उडवत कांस्यपदकाला ( bronze) गवसणी घातलीय. गेल्या टिकियो ऑलिम्पिकनंतर दुसऱ्यांदा भारताला कांस्यपदक मिळाले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत चार कांस्यपदके मिळाली आहेत. विशेष म्हणजे कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन्ही गोल डागले आहेत.


यंदा ‘देवेंद्र फडणवीस’ पडणार? आकड्यांनी वाढवले भाजपचे टेन्शन



मोठी बातमी! कुस्तीपटू अंतिम पंघालच्या अडचणीत वाढ, तीन वर्षाच्या बंदीची कारवाई?

पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाने आक्रमक खेळ दाखविला. परंतु एकाही संघाला गोल करता आला नाही. दुसरा क्वार्टरच्या तिसऱ्या मिनिटाला स्पेनच्या खेळाडूने गोल करत 1-0 ने आघाडी घेतलीय. तर दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटाला भारताचा कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करत 1-1 ने बरोबरी साधली. तर तिसऱ्या क्वार्टरमध्ये कर्णधार हरमनप्रीतने शानदार पेनल्टी स्ट्रोकवर तिसऱ्या मिनिटाला गोल करत भारताला 2-1 ने आघाडी मिळवून दिलीय.


52 वर्षानंतर दोन ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके

भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंहने 30 व्या आणि 34 व्या मिनिटाला गोल केले. हे पदक जिंकत 52 वर्षानंतर हॉकी टीमने ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकली आहे. यापूर्वी 1968 मध्ये मॅक्सिको आणि 1972 मध्ये म्युनिख ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपदके जिंकली होती. परंतु सुवर्णपदकापासून भारतीय संघ दूर राहिला. हॉकी संघाला 60 वर्षानंतर सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. सेमीफायनलमध्ये जर्मनीने भारताला पराभूत केल्याने सुवर्णपदकाची संधी हुकली. वरिष्ठ खेळाडू व गोलकीपर श्रीजेश याचा हा अंतिम आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने निवृत्ती जाहीर केलीय. एकप्रकारे हॉकी संघातील सहकाऱ्यांनी पदक जिंकूनच श्रीजेशला निरोप दिलाय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube