Paris Olympics : कुस्तीपटू अमन सेहरावतनं मैदान मारलं; भारत आणखी एका पदकाच्या जवळ

  • Written By: Published:
Paris Olympics : कुस्तीपटू अमन सेहरावतनं मैदान मारलं; भारत आणखी एका पदकाच्या जवळ

Paris Olympics Aman Sehrawat Qualifies For wrestling Semi Final : 57 किलो कुस्ती (wrestling) प्रकारात भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतने (Aman Sehrawat) अप्रतिम कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अमन सेहरावतने अल्बेनियन कुस्तीपटूचा 12-0 असा पराभव केला. या विजयासह अमन आता पदकापासून केवळ एक पाऊल दूर आहे. जर अमन सेहरावतने उपांत्य फेरी जिंकून अंतिम फेरी गाठली तर त्याचे रौप्य पदक निश्चित होणार आहे आणि जर अंतिम सामन्यातही त्याने विजय मिळवला तर, भारताच्या नावावर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्या सुवर्णपदकाची नोंद होणार आहे. जपानच्या रे हिगुचीशी अमनचा उपांत्य फेरीचा सामना आज (दि.8) रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी सामना होणार आहे.

अमनचा जन्म 2003 मध्ये झज्जर जिल्ह्यात झाला. अमन हा फ्री स्टाईल कुस्तीपटू असून, अमनने 2021 साली राष्ट्रीय स्पर्धेत पहिले विजेतेपद पटकावले. आई-वडिलांचे छत्र अगदी लहानपणीच हरवले, अमनची आई कमलेश यांचे 2013 मध्ये निधन झाले तर, वडिलांचे 2014 मध्ये निधन झाले. लहान वयातच आई-वडील गमावल्यानंतरही अमनचे धैर्य कमी झाले नाही.

सामान्यांनाही एका दिवसात वजन वाढवण किंवा कमी करणं शक्य आहे? काय सांगत मेडिकल सायन्स

वयाच्या 8 व्या वर्षी सुरू केले प्रशिक्षण

आठ वर्षांच्या अमनला दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये पाठवण्याची योजना त्याच्या कुटुंबाने आखली होती. मात्र, दिल्लीला जाण्यापूर्वी सहा महिन्यांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले. तर, अमन दिल्लीत गेल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांंच्या अंतराने त्याचे वडिलांचेही छत्र हरपले.

मोठी बातमी! कुस्तीपटू अंतिम पंघालच्या अडचणीत वाढ, तीन वर्षाची बंदी कारवाई?

अमनची अटकेपार कामगिरी

– अंडर-17 फ्रीस्टाइल 2022 मध्ये किर्गिस्तानमध्ये सुवर्णपदक

– रँकिंग सीरीज अल्माटीमध्ये सुवर्णपदक

– खेलो इंडिया युथ गेम्स 2019 मध्ये सुवर्णपदक

– 2018 चॅम्पियनशिप मनामा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकले

– आशियाई चॅम्पियनशिप 2019 मध्ये सुवर्णपदक जिंकले

– 2023 मध्ये अमनने कझाकिस्तानमध्ये झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

– जानेवारी 2024 मध्ये खुल्या कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो गटात सुवर्णपदक जिंकले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube