Asian Wrestling Championship मध्ये भारतीय महिलांचा डंका; तीन रौप्य, तीन कांस्य पदकांची कमाई

Asian Wrestling Championship मध्ये भारतीय महिलांचा डंका; तीन रौप्य, तीन कांस्य पदकांची कमाई

Asian Wrestling Championship Indian women Wrestler got Silver and Bronze : किर्गिस्तानमधील बिशकेक या ठिकाणी सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेमध्ये ( Asian Wrestling Championship ) अंजू आणि हर्षिता या भारताच्या महिला कुस्तीपटूंनी ( Indian women Wrestler ) जोरदार कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये या महिला खेळाडूंनी तीन रौप्य आणि तीन कांस्य ( Silver and Bronze ) अशी एकूण सहा पदकांची कमाई केली आहे.

VBA Manifesto : लोकसभेसाठी आंबेडकरांच्या वंचितचा खास जाहीरनामा प्रसिद्ध; मतपरिवर्तन होणार?

यामध्ये अंजूने 53 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं. तर हर्षिताला 72 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मनीषा भानवाला हिला 62 किलो वजनी गटात आणि अंतिम कुंडू हिला 65 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळाले. त्याचबरोबर या अगोदर राधिका या कुस्तीपटूने 68 किलो वजनी गटात रौप्य पदक तर शिवानी पवार हिने कांस्यपदकाची कमाई केली होती.

राऊतांबद्दल विचारताच फडणवीसांनी सांगितला स्वतःचा स्तर; काँग्रेसच्या जाहीरनाम्याचीही केली चिरफाड

दुसरीकडे पुरुष खेळाडूंनी देखील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात तीन पदक पटकावली. यामध्ये उदितने 57 किलो वजनी गटात अभिमन्यूने 70 किलो वजनी गटात आणि विकीने 97 किलो वजनी गटात कांस्य पदकांची कमाई केली. त्यानंतर आता या स्पर्धेमध्ये रोमन प्रकाराच्या लढती सोमवारपासून सुरू होणार आहेत.

मेरी कॉमने भारतीय दलाच्या शेफ-डी-मिशनचे पद सोडले

सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली भारताची बॉक्सर एमसी मेरी कॉमने (Mary Kom) शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय दलाच्या शेफ-डी-मिशनचे पद सोडले आहे. मेरी कॉमने भारतीय ऑलिम्पिक संघाची अध्यक्ष पीटी उषा यांना पत्र लिहून आपण वैयक्तिक कारणामुळे हे पद सोडत असल्याचे सांगितले. पीटी उषा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून याबाबत मेरी कॉमने पत्र पाठवलं असल्याचं सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज