Asian Games 2023: भारताच्या खात्यात आणखी 7 पदके, हॉकी संघ उपांत्य फेरीत, असा होता दिवस
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) सोमवारचा दिवस भारतासाठी चांगलाच ठरला. भारतीय खेळाडूंनी सोमवारी 7 पदके जिंकली. त्याचवेळी, आजचा खेळ संपेपर्यंत तेजस्वीन शंकर 4,260 गुणांसह डेकॅथलॉनमध्ये अव्वल स्थानावर आहे. 400 मीटर मिश्र रिलेमध्ये भारतीय संघाला रौप्यपदक (silver medal) मिळाले. आज सुरुवातीला स्केटर्सनी 2 कांस्यपदके (Bronze medals) जिंकली. यानंतर दुपारी टेबल टेनिसच्या महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले.
स्केटिंगमध्ये भारताला कांस्यपदक मिळाले. महिला संघाने स्केटिंग 3000 मीटर रिलेमध्ये 4:34.861 वेळेसह पदक जिंकले. यानंतर, पुरुष संघाने रिले स्पर्धेत 4:10.128 वेळेसह भारतासाठी कांस्यपदक जिंकले.
सुतीर्थ मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांना कांस्य
टेबल टेनिसमध्ये सुतीर्थ मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांना उपांत्य फेरीत कोरियन जोडीकडून पराभव स्वीकारावा लागला. अशा प्रकारे सुतीर्थ मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांना कांस्यपदक मिळाले. कोरियन खेळाडूने भारतीय जोडीचा 1-7, 8-11, 11-7, 8-11, 9-11, 11-5, 2-11 असा पराभव केला.
राहुल गांधींनी सुवर्ण मंदिरात घेतले दर्शन, सेवाही केली; पाहा फोटो
स्टीपलचेस स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदक मिळाले…
पारुल चौधरीने महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत भारतासाठी रौप्यपदक जिंकले. तर या स्पर्धेत प्रितीने कांस्यपदक पटकावले. सोजनने महिलांच्या लांब उडीत रौप्यपदक पटकावले.याशिवाय भारताच्या मुहम्मद अनस, जिस्ना मॅथ्यू, ऐश्वर्या मिश्रा, सोनिया बैश्य, मुहम्मद अजमल यांनी मिश्र रिलेमध्ये रौप्यपदक पटकावले.
World Cup 2023: भारताचा दिग्गज खेळाडू देणार अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमध्ये धडे
भारतीय पुरुष संघ हॉकीमध्ये उपांत्य फेरीत पोहोचला
याशिवाय हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. भारताचा शेवटचा गट सामना बांगलादेशविरुद्ध खेळला गेला आणि त्यात 12-0 असा विजय मिळवला. भारताकडून हरमनप्रीत सिंग आणि मनप्रीत सिंग यांनी प्रत्येकी 3 गोल केले. अभिषेकने दोन गोल केले. तसेच अमित रोहिदास, ललित उपाध्याय, नीलकांत शर्मा आणि गुरजंत सिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला.