राहुल गांधींनी सुवर्ण मंदिरात घेतले दर्शन, सेवाही केली; पाहा फोटो

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबमधील सुवर्ण मंदिरात दर्शन घेतले.

राहुल गांधी उद्या सकाळी 'पालकी सेवा' विधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीच्या स्थापनेनंतर राहुल गांधी पहिल्यांदाच पंजाबला भेट देत आहेत. यापूर्वी भारत जोडो यात्रेदरम्यान सुवर्ण मंदिरात गेले होते.

राहुल गांधी यांचा दौरा अशावेळी आहे की ड्रग्ज प्रकरणात आमदार सुखपाल सिंह खैरा यांच्या अटकेवरून पंजाब काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये तणाव आहे.

दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अकाल तख्त येथे जाऊन भांडे स्वच्छ करून 'सेवा' केली.

पक्षाचे काही नेते 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सोबत काँग्रेसच्या युतीच्या विरोधात आहेत.
