World Cup 2023: भारताचा दिग्गज खेळाडू देणार अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमध्ये धडे

World Cup 2023: भारताचा दिग्गज खेळाडू देणार अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमध्ये धडे

World Cup 2023 : वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) आधी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा केली आहे. अफगाणिस्तानने (Afghanistan) भारताचा माजी फलंदाज अजय जडेजाला (Ajay Jadeja) 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपल्या संघात मार्गदर्शक म्हणून समाविष्ट केले आहे. जडेजाला ही जबाबदारी फक्त वर्ल्ड कपपर्यंतच मिळाली आहे. विश्वचषकापूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

आयसीसी विश्वचषकात अफगाणिस्तान क्रिकेट एक मजबूत संघ म्हणून मैदानात उतरणार आहे. संघाकडे रशीद खान आणि मोहम्मद नबीसारखे अनुभवी फिरकी अष्टपैलू खेळाडू आहेत. गेल्या काही वर्षांपासून अफगाणिस्तानने मर्यादित षटकांमध्ये मोठ्या संघांना टक्कर दिली आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानचा संघ विश्वचषकातही दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

भारतीय खेळपट्टीवर जडेजा फायदेशीर ठरणार
अजय जडेजा 1996 च्या विश्वचषकात भारतीय संघाचा सदस्य होता. त्याला भारतीय परिस्थितीत देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. जडेजाने भारतासाठी 15 कसोटी आणि 196 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 576 धावा केल्या आहेत तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 5,359 धावा आहेत. अशा परिस्थितीत अजय जडेजा विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघासाठी मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

World Cup 2023: उद्घाटन सोहळ्याला ग्लॅमरचा टच, ‘हे’ बॉलिवूड सुपरस्टार्स करणार परफॉर्म

2019 च्या विश्वचषकात संघाकडून निराशा
अफगाणिस्तान संघासाठी शेवटचा विश्वचषक काही खास नव्हता. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही, परंतु असे असतानाही संघाने प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली. यानंतर संघाच्या खेळात सातत्याने सुधारणा होत आहे. यामुळेच अफगाणिस्तानचा संघ थेट विश्वचषकासाठी पात्र ठरला होता.

World Cup 2023 : पुण्याचे MCA स्टेडियम आणि दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमचे रंजक किस्से

अफगाणिस्तान क्रिकेट संघ- हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान , नवीन उल हक.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube