World Cup 2023: उद्घाटन सोहळ्याला ग्लॅमरचा टच, ‘हे’ बॉलिवूड सुपरस्टार्स करणार परफॉर्म
World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी (World Cup 2023) बिगुल वाजला आहे. वर्ल्ड कपची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड (England VS New Zealand) यांच्यातील सामन्याने होईल. मात्र, त्याआधी 4 ऑक्टोबरला विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा (World Cup opening ceremony) आयोजित केला जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार परफॉर्म करणार आहेत. रिपोर्टनुसार, बॉलिवूड स्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करणार आहे. याशिवाय अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) देखील तिच्या नृत्याने क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी 7 वाजता या सोहळ्याला सुरूवात होणार आहे. डिस्ने हॉटस्टारवर क्रिकेटचे चाहते त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
रणवीर सिंग आणि तमन्ना भाटिया यांच्याशिवाय प्रसिद्ध गायिका आशा भोसलेही परफॉर्म करणार आहेत. याशिवाय अरिजित सिंग आणि श्रेया घोषालही परफॉर्म करणार आहेत. संगीतकार आणि गायक शंकर महादेवनही आपल्या बँडसोबत धमाल करणार आहे.
काही तासात मजूर झाला करोडपती, 40 रुपये उसने घेऊन केले ‘हे’ काम
भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध
आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ 8 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना चेन्नई येथे होणार आहे.
टीम इंडियाचा या स्पर्धेतील दुसरा सामना 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानशी होणार आहे. वर्ल्ड कप 2023 मधील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
….म्हणून इथल्या नकली वाघांना पोटशूळ उठला, चित्रा वाघ यांची आदित्य ठाकरेंवर हल्लबोल
सराव सामना पावसाने रद्द झाला
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्ध सराव सामना खेळायचा होता. मात्र पावसामुळे रद्द झाला. दोन्ही संघांमधील सामना गुवाहाटी येथे झाला. हा सामना भारत आणि इंग्लंड या दोघांसाठी खूप महत्त्वाचा ठरला असता पण दुर्दैवाने पावसाने खेळ खराब केला.
टीम इंडिया आता आपल्या दुसऱ्या सराव सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यात या सराव सामन्याचा चांगला फायदा होईल.