VBA Manifesto : लोकसभेसाठी आंबेडकरांच्या वंचितचा खास जाहीरनामा प्रसिद्ध; मतपरिवर्तन होणार?

VBA Manifesto : लोकसभेसाठी आंबेडकरांच्या वंचितचा खास जाहीरनामा प्रसिद्ध; मतपरिवर्तन होणार?

VBA releases Manifesto for 2024 Lok Sabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Elections ) राज्यासह देशातील सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. या दरम्यान आज प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांच्या वंचित बहुजन आघाडीने ( VBA ) अकोला येथे पत्रकार परिषद घेत निवडणूक जाहीरनामा ( Manifesto ) प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी सर्वसमाज घटकांतील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता या जाहिरनाम्याच्या जोरावर मतपरिवर्तन होण्यास मदत होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय आहे वंचितच्या जाहीरनाम्यामध्ये खास?

वंचित बहुजन आघाडीच्या या जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळ्या लोकसभा मतदार संघासाठी स्वतंत्र जाहीरनामा देण्यात आला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या घोषणा करण्यात आले आहेत. यामध्ये एनआरसी आणि सीएए असंविधानिक असल्याचं म्हटलं आहे. हा कायदा मुस्लिमांविरोधात असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याचा परिणाम हिंदू समाजातील ज्यांना व्हीजेएनटी म्हटलं जातं. त्यांच्यावरती होणार आहे. असा आंबेडकर म्हणाले. त्यामुळे हे कायदे 20 टक्के हिंदूंच्या विरोधात असल्याचा आरोप या जाहिरनाम्यात करण्यात आला आहे.

राऊतांबद्दल विचारताच फडणवीसांनी सांगितला स्वतःचा स्तर; काँग्रेसच्या जाहीरनाम्याचीही केली चिरफाड

त्यानंतर कंत्राटी कामगारांना 58 वर्षांपर्यंत निवृत्त करणार नाही, शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा करणार, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशातच शिक्षणाची संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, केंद्र आणि राज्यातील शिक्षणासाठी तरतुदीची मर्यादा वाढवणार, देशातील सार्वजनिक क्षेत्राची विक्रि थांबवणार, नविन औद्योगिक धोरण आणणार, कृषी प्रधान उद्योगाना प्राधान्य देणार त्यातून रोजगार निर्मिती करणार.

Rajkummar Rao: …म्हणून बॉलीवूडमधील दर्जेदार स्टार, अभिनेत्याची घोडदौड सुरुच

अशा घोषणा वंचितच्या या जाहिरनाम्यात करण्यात आल्या आहेत. त्यातून सर्वसमाज घटकांतील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता या जाहिरनाम्याच्या जोरावर मतपरिवर्तन होण्यास मदत होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज