Wrestlers Protest: …तेव्हाच आशियाई गेम्स खेळू; साक्षी मलिकने दिला अल्टिमेटम

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 06 10 At 3.18.32 PM

Sakshi Mailk On Asian Games: हरियाणातील सोनीपत येथे शनिवारी (१० जून) कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान कुस्तीपटू साक्षी मलिकने जेव्हा हे संपूर्ण प्रकरण सुटेल तेव्हाच आम्ही आशियाई खेळ खेळू असा अल्टिमेटम दिला आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) निवर्तमान अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh)  यांना लैंगिक छळाच्या आरोपावरून अटक करण्याची कुस्तीपटूंची मागणी आहे. (wrestler-sakshi-malik-said-we-will-participate-in-asian-games-if-our-issue-will-be-resolve)

साक्षी मलिक म्हणाल्या की, ब्रिजभूषण सिंग यांना अटक करावी. तो बाहेर राहिला तर भीतीचे वातावरण निर्माण होईल. आधी अटक, मग तपास. आम्हाला पाठिंबा मिळत आहे. आम्ही सत्याची लढाई लढत आहोत. काही खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत.

महापंचायत सुरू होण्यापूर्वी कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाले की, सरकारशी आमची जी चर्चा आहे ती आम्ही आमच्यात ठेवू. हे संभाषण आमच्या समर्थनार्थ उभे असलेल्यांसमोर ठेवू, मग ती कोणतीही संघटना असो वा खाप पंचायत. खाप पंचायतींशी चर्चा करूनच खेळाडू पुढील रणनीती ठरवतील.

ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, CSK च्या स्टार गोलंदाजाला संधी

याआधी युपीमधील मुझफ्फरनगर आणि हरियाणातील कुरुक्षेत्र येथेही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खाप महापंचायती झाल्या होत्या. पंचायतीने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेसाठी आणि कुस्तीपटूंच्या इतर मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी सरकारला 9 जूनपर्यंत मुदत दिली होती.

Tags

follow us