चाललंय काय..! कुस्तीपटू अंतिम पंघालही अडचणीत; तत्काळ पॅरिस सोडण्याचे आदेश

चाललंय काय..! कुस्तीपटू अंतिम पंघालही अडचणीत; तत्काळ पॅरिस सोडण्याचे आदेश

Antim Panghal Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे ग्रह फिरले (Paris Olympics) की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आधी विनेश फोगटची अपात्रता. त्यानंतर मीराबाई चानू आणि अविनाश साबळे यांना फायनलमध्ये आलेलं अपयश. त्यानंतर आता भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघालही (Antim Panghal) अडचणीत सापडली आहे. अंतिम पंघालच्या पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेजची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसेच तिला तत्काळ पॅरिस सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यामागे तिच्या बहिणीचं कारण आहे. कॅम्पसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने अॅक्रिडिटेशन कार्डचा वापर करताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी तिला पकडले. इतकेच नाही तर निशा पंघालला काही काळ ताब्यातही घेण्यात आले होते. नंतर या प्रकरणात भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) हस्तक्षेप केल्यानंतर तिला इशारा देऊन सोडून देण्यात आले. या घटनेनंतर आयओएने कठोर भूमिका घेत कुस्तीपटू अंतिम पंघालला तिची बहिण आणि प्रशिक्षकासह पॅरिस सोडण्याचे आदेश दिले आहेत.

अभिमानास्पद! अंतिम पंघालने रचला इतिहास; जागतिक कुस्तीस्पर्धेत ठरली विश्वविजेता

बुधवार 7 ऑगस्टचा दिवस अंतिम पंघालसाठी खराब राहिला. या दिवशी 53 किलो कुस्ती चॅम्प डे मार्स एरिना प्रकारात पहिल्याच टप्प्यात तिचा पराभव झाला. मिळालेल्या माहितीनुसार अंतिम पंघाल तिचे प्रशिक्षक आणि स्पॅरिंग पार्टनरला भेटायला गेली होती. अॅक्रिडिटेशन कार्डचा वापर करून पॅरिस गेम्स व्हिलेजमधून सामान घेऊन जा असे तिने बहिण निशाला सांगितले होते. पण पुढे सुरक्षारक्षकांनी तिला पकडलं. फ्रेंच सुरक्षा अधिकाऱ्यांनी शिस्तभंगाचा आरोपही केला होता. नंतर या प्रकाराची भारतीय ऑलिम्पिक संघाने गंभीर दखल घेतली. कुस्तीपटू अंतिम पंघाल, बहिण निशा पंघाल आणि कोच या सगळ्यांची रवानगी भारतात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अंतिमच्या बहिणीची पोलिसांनी चौकशी केली होती. जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. इतकंच नाही तर अंतिम पंघालचे वैयक्तक सपोर्ट स्टाफ विकास आणि भगत मद्यधुंद अवस्थेत पॅरिसमध्ये टॅक्सीतून फिरत होते. टॅक्सीचं भाडं देण्यास त्यांनी नकार दिला शेवटी टॅक्सी चालकानं या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे या स्टाफ कर्मचाऱ्यांच्याही अडचणी वाढल्या आहे.

ऑलिम्पिकसाठी 70 लाखांची मदत; जागतिक दर्जाचे प्रशिक्षक; केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी सगळं सांगितलं

या प्रकारानंतर भारतीय ऑलिम्पिक संघ बॅकफूटवर गेल्याचे दिसले. अधिकाऱ्यांनी सांगितले की परिस्थिती वाईट आहे.आमचे अधिकारी परिस्थिती हाताळत आहेत. अंतिम पंघाल, तिचा सपोर्ट स्टाफ आणि तिच्या बहिणीवर हद्दपारीची कारवाई होऊ  शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube