दोन सुवर्णपदकांचं स्वप्न भंगलं! मीराबाई चानू, अविनाश साबळेच्या संघर्षाला अपयश
Paris Olympics 2024 : भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेतील बारावा दिवस अतिशय (Paris Olympics 2024 ) दुर्दैवी राहिला. कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) अपात्र घोषित करण्यात आले. त्यामुळे सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं. त्यानंतर आणखी दोन धक्के भारताला बसले. वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि अविनाश साबळे (Avinash Sable) यांनीही सुवर्णपदकासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र दोघांनाही अपयश आलं. त्यामुळे भारताला तीन गोल्ड मेडलची जी प्रतिक्षा होती त्यातील एकही पदक मिळालं नाही. दरम्यान, आज ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंचे सामने आहेत. यामध्ये नीरज चोप्राचा अंतिम सामना होणार आहे. आता नीरज चोप्राच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सगळं संपलं, आता आणखी ताकद नाही : विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा
भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू चौथ्या क्रमांकावर राहिली. 88 किलो वजन प्रकारात चानूला तिसरा क्रमांक मिळाला होता. क्लीन अँड जर्क प्रकारात मात्र चानू चौथ्या क्रमांकावर राहिली. चानूने पहिल्या प्रयत्नात 111 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. खांद्यापर्यंत तिला हे वजन उचलता आलं. परंतु, पुढे डोक्यापर्यंत वजन नेता आलं नाही. पुढील प्रयत्नात मात्र तिने 111 किलो वजन उचलून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
थायलंडच्या खाम्बाओने 112 किलो वजन उचलत दुसरा क्रमांक काबीज केला. कॅम्बेई हीने 112 किलो वजन अगदी सहज उचलत सुवर्णपदकासाठी दावेदारी केली. यानंतर पुढील टप्प्यात 114 किलो वजन उचलायचं होतं. यात मात्र मीराबाई चानू अपयशी ठरली आणि या तिच्या पराभवामुळे भारताची सुवर्णपदकाची आणखी एक संधी हुकली.
थायलंडच्या खाम्बाओने 112 किलो वजन उचलत दुसरा क्रमांक काबीज केला. कॅम्बेई हीने 112 किलो वजन अगदी सहज उचलत सुवर्णपदकासाठी दावेदारी केली. यानंतर पुढील टप्प्यात 114 किलो वजन उचलायचं होतं. यात मात्र मीराबाई चानू अपयशी ठरली आणि या तिच्या पराभवामुळे भारताची सुवर्णपदकाची आणखी एक संधी हुकली. अशा पद्धतीने या दोन्ही सामन्यात भारतीय खेळाडूंना अपयश आलं.
अविनाशचंही गोल्ड मेडल हुकलं
महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याच्याकडूनही सुवर्णपदकाच्या अपेक्षा होत्या. अविनाशने चमकदार कामगिरी करत 300 मीटर स्टीपलचेस प्रकारातील पात्रता फेरीत पाचवा क्रमांक मिळवला होता. फायनलमध्येही एन्ट्री घेतली होती. परंतु, या अखेरच्या टप्प्यात त्याला यशस्वी होता आलं नाही. शर्यतीला सुरुवात झाली तेव्हापासून त्याला पहिल्या पाचमध्येही राहता आलं नाही. अकराव्या क्रमांकावर त्याला समाधान मानावं लागलं. ो
Paris Olympics 2024 : दीपिका कुमारीने केली कमाल, तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक
विनेश फोगटची निवृत्ती
कुस्तीपटू विनेश फोगटने एक ट्विट करून कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे. आई, कुस्तीने मला पराभूत केलं. माफ कर. तुझं स्वप्न माझी हिंमत सगळं काही तुटलं. आता यापेक्षा जास्त ताकद माझ्यात राहिली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. तुमच्या सगळ्यांची मी कायमच ऋणी राहिल असे ट्विट विनेश फोगटने केले आहे.