Paris Olympics 2024 : स्वप्न भंगले, रितिका हुड्डा उपांत्यपूर्व फेरीत पराभव
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) च्या 15 व्या दिवशी रितिका हुडा (Ritika Hooda) उपांत्यपूर्व फेरीच्या सामनात पराभव झाली आहे. 76 किलो वजनी गटात झालेल्या या सामन्यात कझाकिस्तानच्या (Kazakhstan) आयपेरी मेडेट कैझीने (Aiperi Medet Kyzy) शेवटचा पॉंईंट घेतल्याने रितिकाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्याचा पहिल्या राऊंडमध्ये रितिकाने चांगली कामगिरी करत 1-0 अशी आघाडी घेतली होती मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये रितिकाला टायमरमुळे 1 पॉंईंट गमवावा लागला. त्यानंतर स्कोअर 1-1 असा झाला. त्यानंतर टायब्रेकरनंतर शेवटचा टेक्निकल पॉईंट कैझीला मिळाल्याने या सामन्यात रितिकाला पराभव स्वीकारावा लागला.
प्री-क्वार्टर फायनल सामन्यात हंगेरीच्या बर्नाडेट नागीवर रितिकाने 12-2 असा विजय मिळवला आहे. महिलांच्या फ्रीस्टाइल 76 किलो गटात झालेल्या या सामन्यात रितिका सुरूवातीपासूनच शानदार कामगिरी करताना दिसली. पहिल्या राऊंडमध्ये तिने 4-2 अशी आघाडी घेतली मात्र शेवटच्या 5 सेकंदात हंगेरियन कुस्तीपटूने पुनरागमन करत 2 गुण मिळवले. मात्र त्यानंतर या सामन्यात रितिकाने बर्नाडेट नागीला कोणतीही संधी दिली नाही आणि हा सामना 12-2 अशा फरकाने जिंकला.
🇮🇳😓 𝗗𝗲𝗳𝗲𝗮𝘁 𝗳𝗼𝗿 𝗥𝗲𝗲𝘁𝗶𝗸𝗮! Reetika Hooda faced defeat against World No. 1, Aiperi Kyzy, in the quarter-final in the women’s freestyle 76kg category. Despite the result it was a great effort from her.
🤼♀ Reetika Hooda’s campaign at #Paris2024 isn’t over yet as… pic.twitter.com/GOXmcmLKyb
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 10, 2024
Ritika Hooda : रितिका हुडाची क्वार्टर फायनलमध्ये धडक, बर्नाडेट नागीवर मोठा विजय
रितिका अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशिप (2023) मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. तर 2023 रँकिंग सिरीजमध्ये रौप्य पदक रितिकाने जिंकले आहे. तिने गेल्या वर्षी अस्ताना, कझाकस्तान येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 72 किलो फ्रीस्टाइल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.
बांग्लादेशात पुन्हा गोंधळ, आंदोलकांकडून सर्वोच्च न्यायालयाला घेराव, सरन्यायाधीशांचा राजीनामा