Ritika Hooda : रितिका हुडाची क्वार्टर फायनलमध्ये धडक, बर्नाडेट नागीवर मोठा विजय 

Ritika Hooda : रितिका हुडाची क्वार्टर फायनलमध्ये धडक, बर्नाडेट नागीवर मोठा विजय 

Ritika Hooda :  पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) च्या 15 व्या दिवशी रितिका हुडाने (Ritika Hooda) शानदार कामगिरी करत प्री-क्वार्टर फायनल सामन्यात हंगेरीच्या बर्नाडेट नागीवर (Bernadett Nagy) 12-2 असा विजय मिळवला आहे. महिलांच्या फ्रीस्टाइल 76 किलो गटात झालेल्या या सामन्यात रितिका सुरूवातीपासूनच शानदार कामगिरी करताना दिसली.

पहिल्या राऊंडमध्ये तिने 4-2 अशी आघाडी घेतली मात्र शेवटच्या 5 सेकंदात हंगेरियन कुस्तीपटूने पुनरागमन करत 2 गुण मिळवले. मात्र त्यानंतर या सामन्यात रितिकाने बर्नाडेट नागीला कोणतीही संधी दिली नाही आणि हा सामना 12-2 अशा फरकाने जिंकला. रितिकाचा उपांत्यपूर्व फेरीत अपारी काईजीशी सामना होणार आहे. थोड्या वेळात हा सामना सुरु होणार.

रितिका अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशिप (2023) मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे. तर  2023 रँकिंग सिरीजमध्ये रौप्य पदक रितिकाने  जिंकले आहे. तिने गेल्या वर्षी अस्ताना, कझाकस्तान येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 72 किलो फ्रीस्टाइल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.

रितिकासमोर कठीण आव्हान

उपांत्यपूर्व फेरीत रितिकासमोर कडवे आव्हान असणार आहे. त्याचा सामना किर्गिस्तानच्या अपारी मेडेट किझिगीशी होणार आहे. 2023 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये किझीने रौप्यपदक जिंकले होते.

बांग्लादेशात पुन्हा गोंधळ, आंदोलकांकडून सर्वोच्च न्यायालयाला घेराव, सरन्यायाधीशांचा राजीनामा

2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले आहे. तर किझीने यंदाच्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे . पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये तिने चीनच्या वांग झुआनचा पराभव केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube