विनेश फोगटला रौप्य पदक मिळण्याची शक्यता, लवादा कोर्टात केलं अपील

विनेश फोगटला रौप्य पदक मिळण्याची शक्यता, लवादा कोर्टात केलं अपील

Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) च्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. या निर्णयाचा भारतीयांना मोठा धक्का बसला. दरम्यान, आता भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पद मिळू शकते. लवाद न्यायालयात विनेशने दाद मागितली आहे.

Manushi Chhillar: ‘स्त्री 2’ नंतर राजकुमार राव ‘या’ फ्लॉप अभिनेत्रीसोबत करणार काम 

विनेश फोगट 7 ऑगस्ट रोजी महिला फ्रीस्टाइल कुस्तीच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत भाग घेणार होती. त्याच दिवशी प्री-क्वार्टर फायनल, क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल जिंकून तिने अंतिम फेरी गाठल्यामुळे तिचे रौप्य पदक निश्चित झाले. मात्र, अंतिम सामन्याच्या दिवशी सकाळी तिचे वजन मोजण्यात आले तेव्हा, तिचे वजन 100 ग्रॅमपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. तर विनेशने ज्या खेळाडूला उपांत्य फेरीत पराभूत केले होते त्या खेळाडूला अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला.

यंदा ‘देवेंद्र फडणवीस’ पडणार? आकड्यांनी वाढवले भाजपचे टेन्शन 

दरम्यान, अपात्र ठरल्यानतंर विनेश फोगटने IOC च्या निर्णयाला क्रीडा लवादाच्या (CWS) न्यायालयात आव्हान दिलं. विनेशने काल कोर्टात दोन अपील केले होते. त्यातील पहिला मुद्दा उपस्थित केला होता की आपलं वजन आता मोजले जावे, कारण फायनल सुरू व्हायला अजून चार तास (मेल लिहिण्याच्या वेळी) बाकी आहेत… तर दुसरा मुद्दा असा होता की- मी उपांत्य फेरीपर्यंत जिंकले आहे आणि त्यावेळी माझे वजन जास्त नव्हते. मला किमान रौप्य पदक मिळायला हवे होते, अशी अपील विनेशने केली. विनेश फोगटची ही अपील मान्य होण्याची शक्यता आहे. याबाबत CAS लवकरच घोषणा करू शकते.

…काही विद्वान आपल्या महाराष्ट्रात फिरतायत; आंबेडकरांच्या शिलेदाराचा राज ठाकरेंना खरमरीत टोला 

विनेशने वजन कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला…..
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय, असं वाटत असतांनाच विनेश फोगटला ऑल्मिक स्वर्धेतून अपात्र ठरवलं. या मोठ्या निर्णयामागील कारण म्हणजे 50 किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढलं होतं. विनेश फोगटचं वजन निर्धारित मर्यादेपेक्षा अंदाजे 100 ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे ती अपात्र ठरली. पण विनेशने वजन कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण शेवटी तिला अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube