विनेश फोगटने मारलं राजकीय मैदान; भाजप उमेदवाराचा दारुण पराभव करत झाली आमदार
Vinesh Phogat Haryana Election Results : हरियाणाच्या निवडणूक निकालात आज मोठा उलटफेर (Haryana Elections 2024) दिसून येत आहे. मतदानानंतरच्या सर्वच एक्झिट पोलमध्ये काँग्रेस हरियाणा जिंकणार (Congress Party) असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र सगळेच एक्झिट पोल उद्धवस्त करत भाजपने मोठी (BJP) मुसंडी मारली. सध्याच्या ताज्या आकडेवारीनुसार हरियाणात भाजप ५० जागांवर आघाडीवर असून काँग्रेसला फक्त ३५ जागा मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या विनेश फोगाटच्या निवडणुकीचा निकालही आता हाती आला आहे. एकवेळ तर अशी आली होती की जुलाना मतदारसंघात विनेश दोन हजार मतांनी पिछाडीवर पडली होती. पंरतु, नंतर आघाडी घेत विनेश फोगाटने (Vinesh Phogat) विजय मिळवला.
मोठी बातमी! विनेश फोगाटला ‘नाडा’ची नोटीस; 14 दिवसांत मागितलं उत्तर, प्रकरण काय?
हरियाणा विधानसभा निवडणुकीआधी मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिच्याबरोबर बजरंग पुनिया देखील काँग्रेसमध्ये सहभागी झाला होता. यानंतर काँग्रेसने विनेश फोगाटला जुलाना मतदारसंघातून तिकीट दिले होते. विनेश फोगाट विरुद्ध भाजपने कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली होती. या हायहोल्टेज लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. विनेश फोगाट यांच्यासाठी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी प्रचार केला होता.
त्यानंतर आज मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीला काँग्रेस पक्षाने मोठी आघाडी घेतली होती. यामध्ये विनेश फोगाटही आघाडीवर होती. परंतु,नंतर विनेश फोगाट पिछाडीवर पडून थेट चौथ्या क्रमांकावर राहिली. विनेश फोगाट दोन हजार मतांनी पिछाडीवर पडली होती. त्यामुळे विनेश फोगाट जिंकणार की नाही असाही प्रश्न निर्माण झाला होता.
Cong candidate Vinesh Phogat wins her debut election, defeats BJP's Yogesh Kumar from Julana seat in Haryana
— Press Trust of India (@PTI_News) October 8, 2024
नंतर मात्र विनेश फोगाटने जोरदार वापसी केली आणि निवडणूक जिंकण्यात यश मिळवलं. विनेश फोगाटला एकूण 65080 मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपाच्या योगेश बैरागी यांना 59 हजार 65 मते मिळाली. दोन्ही उमेदवारांत अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत विजय मिळवत कुस्तीच्या मैदानातून निवृत्ती घेतलेल्या विनेश फोगाटने पहिल्याच प्रयत्नात आमदारकी मात्र मिळवली.
हरियाणात वारं फिरलं, भाजपाची मुसंडी; अडखळलेला शेअर बाजारही फुल्ल चार्ज!
पिछेहाटीनंतर भाजपाची जोरदार मुसंडी
हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Haryana Assembly Elections) सुरू आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर (Congress Party) होती. परंतु, थोड्याच वेळात येथील चित्र पूर्ण बदलले आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली आहे. सध्याच्या कलांनुसार भाजप हरियाणात जवळपास 48 जागांवर (Haryana Elections 2024) आघाडीवर असून काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे. काँग्रेस सध्या 37 जागांवर आघाडीवर आहे.