Haryana Exit Poll मध्ये भाजपला मोठा धक्का, हरियाणात 10 वर्षांनंतर काँग्रेस सरकार

Haryana Exit Poll मध्ये भाजपला मोठा धक्का, हरियाणात 10 वर्षांनंतर काँग्रेस सरकार

Haryana Exit Poll : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या हरियाणा विधानसभेसाठी (Haryana Election 2024) आज मतदान पार पडलं आहे. तर आता हरियाणामध्ये कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 08 ऑक्टोबर रोजी हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे मात्र त्यापूर्वी अनेक एक्झिट पोल (Haryana Exit Poll 2024) समोर येत आहे. यापैकी काही एक्झिट पोलनुसार हरियाणामध्ये भाजपला (BJP) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

एक्झिट पोलनुसार हरियाणात 10 वर्षानंतर काँग्रेस (Congress) सरकार स्थापन करू शकते. रिपब्लिक वर्ल्डच्या मॅट्रीस सीटच्या एक्झिट पोलनुसार हरियाणामध्ये काँग्रेस 90 पैकी 50 हून अधिक जागा जिंकून बहुमतात सरकार स्थापन करू शकते.

रिपब्लिक वर्ल्डच्या मॅट्रीनुसार, हरियाणामध्ये काँग्रेसला 55 ते 62 जागा मिळू शकतात. तर सत्ताधारी भाजपला 18 ते 24 जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर इंडियन नॅशनल लोकदलाला 3 ते 6 जागा मिळू शकतात आणि इतरांना 2 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज रिपब्लिक वर्ल्डच्या मॅट्रीस सीटच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे.

धडा शिकवणार अन्…, हर्षवर्धन पाटलांना भाजपचा इशारा, पत्र व्हायरल

तर दुसरीकडे हरियाणा विधानसभेतील सर्व 90 जागांवर शनिवारी संध्याकाळी 6 वाजता मतदान पूर्ण झाले असून राज्यात अंदाजे 65 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. यावेळी हरियाणामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळाली आहे. निवडणुकीचे निकाल मंगळवारी 8 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनावल्यानंतर महायुती सरकारचा निर्णय, 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

follow us
  • fb
  • instagram
  • youtube