Vinesh Phogat : विनेश फोगट प्रकरणात मोठी अपडेट, ‘या’ दिवशी मिळणार रौप्य पदक?

Vinesh Phogat : विनेश फोगट प्रकरणात मोठी अपडेट, ‘या’ दिवशी मिळणार रौप्य पदक?

Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या फाइनलपूर्वी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) निर्धारित वजनापेक्षा जास्त वजन असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. या प्रकरणानंतर क्रीडा लवादाच्या न्यायालयात (CAS) आपल्या एकत्रित रौप्यपदक मिळावा या मागणीसाठी फोगटकडून याचिका दाखल करण्यात आली होती.

या आज विनेश फोगटच्या याचिकेवर क्रीडा लवादाच्या न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यानंतर आता या प्रकरणाचा निर्णय 13 ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी दिला जाणार असल्याची माहिती क्रीडा लवादाच्या न्यायालयाकडून देण्यात आली आहे.

माहितीनुसार, या प्रकरणाचा निर्णय 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता येणार आहे. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी संपली असून आता 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता निर्णय येणार आहे. या प्रकरणात निकाल रविवारी (11 ऑगस्ट) रोजी येणार होता मात्र आता या प्रकरणाचा निकाल 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता येणार आहे. फायनल सामन्यापूर्वी 100 ग्रॅम जास्त वजनामुळे विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले होते.

तर दुसरीकडे पॅरिस ऑलिम्पिक संपण्यापूर्वी या प्रकरणी निर्णय घेतला जाईल अशी माहिती यापूर्वी सीएएसने दिली होती मात्र न्यायालयाने या प्रकरणात दोन्ही बाजूंना अतिरिक्त पुरावे सादर करण्यासाठी 11 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. सामान्यत: तदर्थ पॅनेलला निर्णय देण्यासाठी 24 तास दिले जातात. मात्र या प्रकरणात पॅनलने दुसऱ्यांदा मुदतवाढ मागितली आहे. ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया यांनी विनेशची बाजू न्यायालयात मांडली आहे.

मारुतीच्या कार्सवर बंपर डिस्काउंट, Wagon R खरेदीवर होणार 67 हजारांची बचत

काय आहे CAS ?

कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट ही एक स्वतंत्र संस्ठा आहे. याचा काम जगभरातील खेळांशी संबंधित सर्व कायदेशीर विवाद सोडवणे आहे. या संस्थेची स्थापना 1984 मध्ये करण्यात आली होती. याचा मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉसने येथे आहे तसेच याची न्यायालये न्यूयॉर्क, सिडनी आणि लॉसने येथे आहेत. याच ज्या शहरात ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येते तेथे देखील या संस्थेची तात्पुरती न्यायालये स्थापन करण्यात येते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube