स्वत: चा देश सोडत दोन देशांसाठी ऑलम्पिक पदकांना गवसणी; कोण आहे Manu Bhaker ची पिस्टल कोच?

स्वत: चा देश सोडत दोन देशांसाठी ऑलम्पिक पदकांना गवसणी; कोण आहे Manu Bhaker ची पिस्टल कोच?

Manu Bhaker Pistol Coach Munkhbayar Dorjsuren : पॅरिस ऑलिम्पिक्स स्पर्धेत (Paris Olympics2024) दहा मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर (Manu Bhaker) आणि सरबज्योत सिंह यांनी कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेतील मनू भाकरचे हे दुसरे पदक ठरले. एकाच स्पर्धेत दोन पदके मिळवणारी ती पहिलीच खेळाडू ठरली. मात्र या दरम्यान आणखी एका नावाची चर्चा सुरू आहे. ते म्हणजे मनूची पिस्टल कोच मुंखबायर डोर्जसुरेन ज्यांनी दोन देशांसाठी ऑलम्पिक पदकांना गवसणी घालूनही शेवटी आपला देश सोडला आहे. मुंखबायर डोर्जसुरेन कोण आहेत? जाणून घेऊ सविस्तर…

‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘या’ कारणाने कोकण हार्टेड गर्ल अंकिता ढसाढसा रडली, निक्की तांबोळीसोबत बाचाबाची

मनू भाकरच्या यशामागे डोर्जसुरेन यांची प्रचंड मेहनत आहे. त्यांचा जन्म मंगोलियामध्ये झाला आहे. त्या 55 वर्षांच्या आहेत. त्यांनी 6 ऑलम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांनी मंगोलिया आणि जर्मनी या दोन देशांसाठी ऑलम्पिक पदकं जिंकली आहेत. ज्यामध्ये 1992 साली मंगोलियासाठी 25 मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये कांस्यपदक तर 2008 मध्ये जर्मनीसाठी याच प्रकारात पुन्हा कांस्यपदक जिंकले आहे.

Ismail Haniyeh : इराणमध्ये काय करत होता हनिया, कशी झाली हत्या? वाटा ए टू झेड

त्यांना प्रचंड अनुभव आहे. सुरूवातीला त्या मंगोलियासाठी 2 तर जर्मनीचं नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांनी 2004, 2008, 2012 ऑलम्पिक स्पर्धांमध्ये जर्मनीचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण पदकं जिंकली आहेत. 2002 साली त्यांना विदेशी कोच शूटींग टीममध्ये घेण्यात आलं.

त्यांच्यावर पिस्टल टीम खेळाडूंना सांभाळण्याची जबाबदारी मिळाली. ज्यामध्ये मनू भाकरचा देखील समावेश आहे. डोर्जसुरेन यांना खास पॅरिस ऑलम्पिकसाठी निवडण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी त्यांची निवड सार्थ ठरवली आहे. ज्यांच्यामुळे त्यांच्या खेळाडूंनी पदक जिंकत इतिहास रचला आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता मनू 25 मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये देखील देशाचं नावं उंचावेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube