लोकसभेच्या मदतीची विधानसभेच्या रुपाने परतफेड करा; शिवसैनिकांचे लंकेंना आवाहन
अहमदनगर – लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) धामधूम सुरू होणार आहे. या निवडणुकींसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अशातच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) खासदार करण्यामध्ये पारनेर (Parner) तालुक्यातील शिवसैनिकांनी अपार कष्ट घेतले होते. त्यामुळे लंकेंनी पारनेर नगर विधानसभा (Parner Nagar Vidhansabha) मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी सर्वसामान्य शिवसैनिकांनी केली.
IAS कोचिंग सेंटर दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई, सेंटरच्या मालकासह दोघांना अटक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मशाल यात्रा, शिवसंवाद मेळावे आणि भगवा सप्ताह पारनेर तालुक्यात आयोजित करण्यात आला, अशी माहिती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी दिली. यावेळी ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख प्रियंका खिलारी, युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, जेष्ठ नेते डॉ.भास्करराव शिरोळे, टाकळी ढोकेश्वर गटप्रमुख धनंजय निमसे, उपनगराध्यक्ष राजू शेख, माजी पंचायत समिती सदस्य पोपट चौधरी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
Haribhau Bagde : मोदींनी हरिभाऊंना विचारलं, तुम्हाला महाराष्ट्रा बाहेर जायचं आहे का..
उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील…
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. तसेच राज्याचे कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी मागील काळात केलेल्या कामाचीच राज्याला खऱ्या अर्थाने गरज आहे, अशी तमाम शिवसैनिकांची भावना आहे आणि तेच महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटेवर आणतील. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व शिवसैनिक जोमाने कामाला लागले असून उध्दव ठाकरे हेच पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास पारनेर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केला.
लोकसभेच्या मदतीची परतफेड विधानसभेच्या रुपाने करा
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार निलेश लंके यांना खासदार करण्यामध्ये पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी अपार कष्ट घेतले आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला पारनेर नगर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेला देऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा आमदार या ठिकाणी करावा, लोकसभेला झालेल्या मदतीची विधानसभेच्या रूपाने परतफेड करावी, अशी मागणी सर्वसामान्य शिवसैनिकांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ही मागणी केली आहे. त्यामुळे खासदार निलेश लंके महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या या भावनेचा विचार करतात का? हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.