Paris Olympics 2024 मध्ये ‘चक दे! इंडिया’, न्यूझीलंडचा उडवला धुव्वा
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या (Paris Olympics 2024) पहिल्या दिवशी आज भारतीय हॉकी पुरुष संघाने दमदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 3-2 ने (IND vs NZ 2024) पराभव केला आहे. भारताचा न्यूझीलंड विरुद्ध ग्रुप बी मध्ये सामना झाला. या सामन्याच्या 8 व्या मिनिटाला लेन सॅमने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताला धक्का दिला. मात्र मनदीप सिंगने भारतीय संघाचे पुनरागमन करत 24व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून स्कोअर बरोबरीत आणला.
त्यानंतर विवेक सागर प्रसादने या सामन्याच्या 34व्या मिनिटाला फिल्ड गोल करून भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र शेवटच्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने न्यूझीलंडने दुसरा गोल करत हा सामना 2-2 ने बरोबरीत आणला. न्यूझीलंडकडून सायमन चाइल्डने गोल केला. त्यानंतर सामना संपण्यासाठी काही मिनटे शिल्लक असताना भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी स्ट्रोकच्या मदतीने गोल करत भारताला या सामन्यात 3-2 ने अशी आघाडी मिळवून दिली.
तर दुसरीकडे भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेनने (Lakshya Sen) देखील आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्याने ग्वाटेमालाच्या केविन कॉर्डेनचा 21-8 आणि 22-20 ने पराभव केला. या सामन्यात लक्ष्य सेनने पहिला गेम सहज जिंकला होता मात्र दुसऱ्या गेममध्ये केविन कॉर्डनने कडवी झुंज दिली. मात्र तरीही देखील लक्ष्य सेनने पुनरागमन करत स्कोअर 20-20 असा केला आणि नंतर 22-20 असा गेम जिंकला.
Update: INDIA MEN’S HOCKEY TEAM POOL MATCH👇
Mission #ChakdeIndia💯😍
Our #MenInBlue 🇮🇳 gave a solid performance against New Zealand 🇳🇿, defeating the Kiwis 3-2 in a thrilling match @TheHockeyIndia pic.twitter.com/7uEhfuRb81
— SAI Media (@Media_SAI) July 27, 2024
तर आज भारताची नेमबाज मनू भाकरने (Manu Bhakar) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटच्या अंतिम सामन्यात एंट्री केली आहे. त्यामुळे आता या 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये पदक मिळण्याची शक्यता वाढली आहे. मनू भाकर या इव्हेंटच्या पात्रता फेरीत एकूण 580 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होती.
लाडकी बहिण योजनेला वित्तविभागाचा विरोध? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
मनूने पहिल्या राऊंडमध्ये 97, दुसऱ्या राऊंडमध्ये 97, तिसऱ्या राऊंडमध्ये 98, चौथ्यामध्ये 96, पाचव्यामध्ये 96 आणि सहाव्या राऊंडमध्ये 96 गुण मिळवले. तर आता उद्या 28 जुलै रोजी मनू भाकर महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे.