Paris Olympics 2024 मध्ये लक्ष्य सेनची धमाकेदार सुरुवात, केविन कॉर्डेनचा केला पराभव

Paris Olympics 2024 मध्ये लक्ष्य सेनची धमाकेदार सुरुवात, केविन कॉर्डेनचा केला पराभव

Lakshya Sen : भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेनने (Lakshya Sen) पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये धमाकेदार सुरुवात करत आपला पहिला सामना जिंकला आहे. लक्ष्य सेनने आपल्या पहिल्या सामन्यात ग्वाटेमालाच्या केविन कॉर्डेनला पराभव केला.

या सामन्यात लक्ष्य सेनने पहिला गेम सहज जिंकला होता मात्र दुसऱ्या गेममध्ये केविन कॉर्डनने (Kevin Corden) कडवी झुंज दिली. मात्र तरीही देखील लक्ष्य सेनने पुनरागमन करत स्कोअर 20-20 असा केला आणि नंतर 22-20 असा गेम जिंकला. अशाप्रकारे त्याने आपल्या पहिल्या सामन्यात 21-8 आणि 22-20 ने सामना जिंकला.

तर दुसरीकडे आज भारताची नेमबाज मनू भाकरने (Manu Bhaker) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटच्या अंतिम सामन्यात एंट्री केली आहे. त्यामुळे आता या 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये पदक मिळण्याची शक्यता वाढली आहे. मनू भाकर या इव्हेंटच्या पात्रता फेरीत एकूण 580 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होती. मनूने पहिल्या राऊंडमध्ये 97, दुसऱ्या राऊंडमध्ये 97, तिसऱ्या राऊंडमध्ये 98, चौथ्यामध्ये 96, पाचव्यामध्ये 96 आणि सहाव्या राऊंडमध्ये 96 गुण मिळवले.

… तर राजकारणातून संन्यास घेणार, प्रफुल पटेलांची मोठी घोषणा, अनेक चर्चांना उधाण

तर आता उद्या 28 जुलै रोजी मनू भाकर महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे.

Paris Olympics 2024 : मनू भाकरने केली कमाल, भारताला मिळणार ‘या’ इव्हेंटमध्ये पहिलं पदक

follow us
  • fb
  • instagram
  • youtube