ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाला सपोर्ट करा; Ayushmann Khurrana ने केलं आवाहन

Ayushmann Khurrana आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.

ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाला सपोर्ट करा; Ayushmann Khurrana ने केलं आवाहन

Ayushmann Khurrana and Mansukh Mandaviya Apeal to support Olympic : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. पॅरीसमध्ये खेळाडू जमले असून सीन नदीवर ऐतिहासिक ऑलिम्पिक सोहळ्याची तयारीही पूर्ण झाली आहे. दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) आणि बॉलीवुड स्टार आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.

एसटी महामंडळाला विठ्ठल पावला ! तब्बल 29 कोटींची झाली ‘आषाढी वारी’

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला गौरव मिळवून देण्यासाठी भारतीय दलाचे उत्साहवर्धन करा. असं आवाहन केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया आणि बॉलीवुड स्टार आयुष्मान खुराना यांनी केले. तर या मोहिमेची सुरूवात म्हणून आयुष्मानला मनसुख मांडविया यांनी भारतीय संघाचा स्मरणार्थ टीशर्टही दिला.

View this post on Instagram

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

आयुष्मानने सोशल मीडियावर लिहिले, “ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा कार्यक्रम आहे आणि यात भाग घेणारे आपल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”

लोकसभा निवडणुकामधील चुकांची पुनरावृत्ती टाळा; विखेंनी कार्यकर्त्यांना ठणकावले

तो पुढे लिहितो, “चला त्यांना भारताचा अभिमान वाढवण्यासाठी प्रोत्साहित करूया. चला त्यांना दाखवूया की आमच्या खेळांबद्दलची आमची दृढता, संकल्प आणि आवड किती गहन आहे. आज युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांना भेटून भारतीय दलाला प्रोत्साहित करण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्याचा मोठा सन्मान आहे. जय हिंद! 🏆💯”

follow us