कामगारांना मोफत आरोग्य तपासणी, ओव्हरटाईमसाठी दु्प्पट वेतन; देशात नवीन कामगार संहिता लागू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अधिकृतपणे चार नवीन कामगार संहिता लागू केल्या आहेत.
Four new labour codes become effective from today know details : मोदी सरकारने आजपासून (दि.21) देशभरात चार ननीव कामगार संहिता लागू करण्याची घोषणा केली आहे. याबाबत केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती दिली आहे. आजपासून लागू होणारा बदल कामगार व्यवस्थेतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल असल्याचे म्हटले जात आहे. नव्याने लागू होणाऱ्या कामगार संहितेमध्ये नेमक्या कोण-कोणत्या हमी देण्यात आल्या आहेत आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होणार त्याबद्दल जाणून घेऊया…
कायदेशीर सुधारणा नव्हे तर, कामगारांसाठी ऐतिहासिक क्रांती
नव्याने लागू होणारी कामगार संहिता ही केवळ कायदेशीर सुधारणा नाही तर, भारतातील 40 कोटींहून अधिक कामगारांच्या जीवनात एक ऐतिहासिक क्रांती असल्याचा सरकारचा दावा आहे.मोदी सरकारचा दावा आहे की या सुधारणा केवळ कामगार कायद्यांबद्दल नाहीत तर कामगार न्याय आणि कामगार प्रतिष्ठेच्या नवीन युगाची सुरुवात आहेत. नवीन कामगार संहिता म्हणजे भारताला जागतिक कामगार मानकांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न आहे.
मोदी सरकार की गारंटी: हर श्रमिक का सम्मान!
आज से देश में नई श्रम संहिताएं लागू हो गई हैं, जिससे मिलेगी :
✅ सभी कामगारों को समय से न्यूनतम वेतन की गारंटी
✅ युवाओं को नियुक्ति पत्र की गारंटी
✅ महिलाओं को समान वेतन और सम्मान की गारंटी
✅ 40 करोड़ श्रमिकों को सामाजिक सुरक्षा की…— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) November 21, 2025
नवीन कामगार संहिता २०२५: नवीन कामगार संहितेतील ठळक मुद्दे
– सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी.
– प्रत्येक तरुणासाठी नियुक्ती पत्र अनिवार्य आहे.
– महिलांना समान वेतन आणि समान आदर
– 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा कवच
– फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांना फक्त १ वर्षानंतर ग्रॅच्युइटी
– 40 वर्षांवरील कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी
– ओव्हरटाईमसाठी दुप्पट पगाराची हमी
– धोकादायक क्षेत्रांमध्ये 100% आरोग्य सुरक्षा
– इंटरनेशनल मानकांवर आधारित श्रमिकांना सामाजिक न्यायाची गॅरंटी
40 वर्षांवरील कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी
मांडविया यांनी एक्सवर नवीन कामगार संहितांचे इतर अनेक फायदेदेखील अधोरेखित केले आहेत. ज्यात कर्मचाऱ्यांना एक वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅच्युइटी मिळण्याची हमी देण्यात आली आहे. तसेच 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांची दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. याशिवाय ओव्हरटाइमसाठी दुप्पट वेतन मिळण्याची तरतूद नव्या संहितेत आहे. तर, धोकादायक क्षेत्रातील कामगारांना यापुढे 100 टक्के आरोग्य सुरक्षा मिळणार आहे.
आजपासून नेमके कोणते चार नवीन कामगार संहिता लागू झाले आहेत?
सरकारने लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांमध्ये वेतन संहिता (2019), औद्योगिक संबंध संहिता (2020), सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती (OSHWC) संहिता (2020) यांचा समावेश आहे. नव्या संहिता केंद्र सरकारच्या अंतर्गत पूर्वी लागू असलेल्या 29 केंद्रीय कामगार कायद्यांची जागा घेणार आहेत.
गिग कामगार आणि महिला कर्मचाऱ्यांना फायदा
नवीन कामगार संहितांमध्ये अशा सुधारणांचा समावेश आहे ज्यामुळे गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार, महिला कर्मचारी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये (MSME) काम करणाऱ्यांना लक्षणीय फायदा होणार आहे. कारण पहिल्यांदाच लेबर कोड्समध्ये गिग वर्क, प्लेटफॉर्म वर्क आणि अॅग्रीगेटर्सची परिभाषा निश्चित करण्यात आली आहे.
अॅग्रीगेटर कंपन्यांना स्वतंत्र कल्याण निधी तयार करावा लागणार
नव्या कामगार संहितानुसार आता अॅग्रीगेटर कंपन्यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या 1-2 टक्के रक्कम कामगारांना मिळणाऱ्या एकूण देयकाच्या 5% पर्यंत मर्यादित असलेल्या वेगळ्या कल्याण निधीमध्ये योगदान द्यावे लागेल. या निधीमुळे कामगारांना सामाजिक सुरक्षा लाभ मिळतील, ज्यामुळे डिलिव्हरी मोबिलिटी कामगारांना लक्षणीय फायदा होईल. घर आणि कामाच्यादरम्यान प्रवास करताना झालेला अपघात रोजगाराशी संबंधित घटना मानला जाईल, ज्यामुळे कामगार अपघात भरपाईसाठी पात्र ठरेल.
युनिव्हर्सल अकाउंट नंबर सुरू केला जाणार
कामगारांना कल्याणकारी योजनांचे पूर्ण लाभ मिळण्यासाठी आता आधारशी जोडलेला एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर सुरू केला जाणार आहे. यामुळे कामगारांना सर्व राज्यांमध्ये कल्याणकारी योजनांचे फायदे मिळू शकतील. याचा अर्थ असा की, जरी एखादा कामगार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेला तरी त्याला पूर्वीप्रमाणेच कल्याणकारी योजनेचे फायदे मिळत राहतील.
महिलांना मिळणार अधिक लाभ
नव्या कामगार संहितेत मातृत्व लाभ अधिक मजबूत करण्यात आले आहेत. त्यानुसार आता महिलांना 26 आठवड्यांची पगारी रजा, पाळणाघर सुविधा आणि घरून काम करण्याचे लवचिक पर्याय मिळणार आहेत. त्याशिवाय महिला कर्मचाऱ्यांना 3500 हजारांचा वैद्यकीय बोनसदेखील मिळणार आहे.
