एसटी महामंडळाला विठ्ठल पावला ! तब्बल 29 कोटींची झाली ‘आषाढी वारी’

एसटी महामंडळाला विठ्ठल पावला ! तब्बल 29 कोटींची झाली ‘आषाढी वारी’

ST Earn 29 crores in Pandharpur Aashadhi Wari : आषाढ महिन्यामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी एकादशीनिमित्त (Aashadhi Wari) यात्रा भरते. या वारीचा पंढरपुरात मोठा सोहळा आणि राज्यभर याचा जल्लोष असतो. संतांच्या पालख्या पंधरा ते वीस दिवस अगोदरच विठ्ठलाच्या भेटीला रवाना होतात. तर आषाढी एकादशीला या पालख्या विठ्ठलाची भेट घेतात. त्यात यंदा आषाढी यात्रेत 9 लाख 53 हजार विठ्ठलभक्तांनी एसटीतून सुरक्षित प्रवास केल्याने एस.टी. महामंडळाला (ST) 28 कोटी 92 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

लोकसभा निवडणुकामधील चुकांची पुनरावृत्ती टाळा; विखेंनी कार्यकर्त्यांना ठणकावले

दरवर्षी प्रमाणे यंदा देखील आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी. महामंडळातर्फे 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान सुमारे 5 हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या 5 हजार बसेसव्दारे 19हजार 186 फेऱ्यांमधून 9 लाख 53 हजार भाविक-प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून 28 कोटी 92 लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे.

शिंदे गट उच्च न्यायालयात, ‘त्या’ प्रकरणात ठाकरे गटाविरोधात याचिका दाखल

यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाडयांचे नियोजन करण्यात आले होते. 5 हजार बसेस वारकऱ्यांच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळया 4 तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाडया सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगण सोहळयासाठी एसटीकडून 200 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

प्रवाशांनी एसटीवर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाला एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक प्ररिश्रमांतून सार्थ ठरवले आहे. यापुढे देखील सर्वसामान्य प्रवासी जनतेला अशाच प्रकारे सुरक्षित, किफायतशीर व सन्मानजनक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबध्द राहिल. असा विश्वास एसटी महामंडळाचे मा.उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, डॉ.माधव कुसेकर यांनी व्यक्त केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube